भाजीपाला आणायला निघालेल्या युवकास बोलेरो पिकअपने उडवले; जागीच ठार, बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजीपाला आणायला गेलेल्या व्यक्तीला भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपने उडवले. यात ३७ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, 6 जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास धाड- बुलडाणा रोडवरील हतेडी बुद्रूक बसथांब्याजवळ घडली. दिनकर सूर्यभान जाधव (रा. हतेडी बुद्रूक ता. बुलडाणा) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिनकर जाधव भाजीपाला आणण्यासाठी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भाजीपाला आणायला गेलेल्या व्यक्तीला भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपने उडवले. यात ३७ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, 6 जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास धाड- बुलडाणा रोडवरील हतेडी बुद्रूक बसथांब्‍याजवळ घडली. दिनकर सूर्यभान जाधव (रा. हतेडी बुद्रूक ता. बुलडाणा) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दिनकर जाधव भाजीपाला आणण्यासाठी बसथांब्‍यावर गेले होते. त्याच वेळी कोठा (जि. जालना) येथून नागपूरकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअपने (क्र. एमएच 28 बीबी 2785) ने पायी चालत असलेल्या जाधव यांना उडवले. यात जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. जाधव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बोलेरो पिकअप चालकाला नागरिकांनी घटनास्थळीच पकडून ठेवले. वृत्त लिहीपर्यंत बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.