भाजीपाला दुकानदारांसह पानटपरीचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल, अमडापूर, मोताळ्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करत पानटपरी उघडी ठेवणाऱ्याविरोधात अमडापूर पोलीस ठाण्यात काल, 15 एप्रिलच्या रात्री 8 च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.पेट्रोलिंग करत असताूना चिखली- अमडापूर रस्त्यावर एक पानटपरी उघडी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पानटपरीधारक विनामास्क होता. करीम पटेल मुनिर पटेल (39, रा. इंदिरानगर, अमडापूर, ता. चिखली) या पानटपरी चालकाविरोधात पोलिसांनी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करत पानटपरी उघडी ठेवणाऱ्याविरोधात अमडापूर पोलीस ठाण्यात काल, 15 एप्रिलच्‍या रात्री 8 च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
पेट्रोलिंग करत असताूना चिखली- अमडापूर रस्त्यावर एक पानटपरी उघडी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पानटपरीधारक विनामास्क होता. करीम पटेल मुनिर पटेल (39, रा. इंदिरानगर, अमडापूर, ता. चिखली) या पानटपरी चालकाविरोधात पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
मोताळ्यात भाजीपाला विक्रेत्‍याविरोधातही गुन्हा
मोताळा फाट्यावर दोन भाजीपाला दुकानदारांवर आज, 16 एप्रिलला बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवनावश्यक भाजीपाला दुकाने सुरु करण्याची परवानगी असली तरी या दुकानदारांनी मास्क लावला नव्हता व दुकानावर शारीरिक दुरीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण उडदेमाळी यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी सुखराम उमाळे, मदन मोरे (रा. मोताळा) यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.