भाजीबाजाराला आग, पोलिसांच्‍या सतर्कतेमुळे टळले मोठे नुकसान; डोणगाव येथील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजी बाजाराला आग लागून विक्रेत्यांचे सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना डोणगाव (ता. मेहकर) येथे 20 मार्चच्या पहाटे 3 च्या सुमारास समोर आली. गस्तीवरील पोलिसांना धूर दिसून आल्याने त्यांनी तातडीने प्रयत्न करत ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवली. पहाटे ३ च्या सुमारास पोहेकाँ मंगेश खडसे व चालक श्री. वाघ हे …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भाजी बाजाराला आग लागून विक्रेत्‍यांचे सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना डोणगाव (ता. मेहकर) येथे 20 मार्चच्‍या पहाटे 3 च्‍या सुमारास समोर आली. गस्‍तीवरील पोलिसांना धूर दिसून आल्याने त्‍यांनी तातडीने प्रयत्‍न करत ग्रामस्‍थांच्‍या मदतीने आग विझवली.

पहाटे ३ च्‍या सुमारास पोहेकाँ मंगेश खडसे व चालक श्री. वाघ हे गस्‍तीवर होते. त्‍यांना भाजी बाजारातून धूर येत असल्याचे दिसले. त्‍यांनी तिथे धाव घेऊन पाहिले असता आग लागलेली होती. त्‍यांनी तातडीने ग्रामस्‍थांना मदतीला बोलावून आग विझविण्यासाठी प्रयत्‍न केले. आगीत पवन काळे, कुसूम जयवाळ, गोपाळ परमाळे, भगवान काळे यांच्‍या दुकानातील भाजीपाल्यासह साहित्‍य जळून नुकसान झाले.

अग्‍निशमन दल आलेच नाही…

आग लागल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने अग्‍निशमन दलाशी संपर्क केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. वेळीच अग्‍निशमन दल आले असते तर नुकसान होण्यापासून वाचले असते, अशी प्रतिक्रिया भाजीपाला विक्रेत्‍यांनी व्‍यक्‍त केली.