भाडगणी शिवारातील जुगार अड्ड्यावर ‘एलसीबी’चा छापा; 14 जणांना पकडले, सव्वा तीन लाखांची कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाडगणी (ता. मलकापूर) शिवारात जुगार अड्ड्यावर छापा मारून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने 14 जणांना ताब्यात घेतले, तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यांच्याकडून 3 लाख 23 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज, 17 मे रोजी करण्यात आली. प्रमोद लक्ष्मण गावंडे (35, रा. भाडगणी), अशोक भास्कर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भाडगणी (ता. मलकापूर) शिवारात जुगार अड्ड्यावर छापा मारून बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने 14 जणांना ताब्‍यात घेतले, तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. त्‍यांच्‍याकडून 3 लाख 23 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. ही कारवाई आज, 17 मे रोजी करण्यात आली.

प्रमोद लक्ष्मण गावंडे (35, रा. भाडगणी), अशोक भास्‍कर पाटील (44, रा. दुर्गानगर, मलकापूर), किशोर एकनाथ आमले (40, रा. भाडगणी), विनोद भानुदास शिंदे (41, रा. दुर्गानगर, मलकापूर), श्याम रवींद्र बागल (23, रा. भाडगणी), गणेश हरीदास शिंदे (26, रा. भाडगणी), रवींद्र अशोक शिंदे (30, रा. दुर्गानगर, मलकापूर), कमल राधाकिसन मालपाणी (55, रा. दुर्गानगर, मलकापूर), अनिल नारायण पाटील (39, रा. दुर्गानगर, मलकापूर), सुरेश रमेश इंगळे (30, रा. उमाळी), राम रवींद्र बागल (30, रा. भाडगणी), नीलेश तुकाराम पाटील (33, दुर्गानगर, मलकापूर), पंकज नामदेव गोसावी (30, दुर्गानगर मलकापूर), शालिकराम शिवराम पाटील (45, रा. दुर्गानगर, मलकापूर) यांचा समावेश असून, रामा खोळके (रा. भाडगणी) हा पळून जाण्यात यशस्वी झाला. प्रमोद गावंडे हा बोराखेडी पोलीस ठाण्याच्‍या हद्दीत भाडगणी शिवारात जुगार अड्डा चालवत असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली होती. त्‍याआधारे एलसीबीने हा छापा मारला.

रोख १३५९० रुपये, ६ दुचाकी (किंमत ३,१०,०००), ५२ ताश पत्ते असा एकूण ३,२३,५९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्‍त केला आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्‍या आदेशाने पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस नाईक दीपक पवार, पोना संजय भुजबळ, पोकाँ विजय सोनोने, पोकाँ केदार फाळके, पोकाँ सुभाष वाघमारे, पोकाँ गजानन गोरले, नापोकाँ  विजय मुंढे यांच्‍यासह बोराखेडी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार प्रल्हाद वानखेडे, पोकाँ ज्ञानेश्वर धामोडे यांनी पार पाडली.