भादोल्यात घर फोडले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन मजली घराच्या वरच्या मजल्याच्या दरवाजाचे कुलून तोडून चोरट्याने 20 हजार रुपये रोख व कागदपत्रे चोरून नेली आहेत.ही घटना भादोला (ता. बुलडाणा) येथे 8 जूनला सकाळी समोर आली. नीलेश रामचंद्र शिरसाट (27, भादोला) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नीलेश शिरसाट शेती करतात. त्यांचे गावात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दोन मजली घराच्‍या वरच्या मजल्याच्‍या दरवाजाचे कुलून तोडून चोरट्याने 20 हजार रुपये रोख व कागदपत्रे चोरून नेली आहेत.ही घटना भादोला (ता. बुलडाणा) येथे 8 जूनला सकाळी समोर आली.

नीलेश रामचंद्र शिरसाट (27, भादोला) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. नीलेश शिरसाट शेती करतात. त्‍यांचे गावात दुमजली घर आहे. त्‍यांच्‍या मोठ्या आई वरच्‍या मजल्यावर राहतात. त्‍या त्‍यांच्‍या बहिणीकडे गेल्या असल्याची संधी साधून चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून लाकडी पेटी चोरून नेली. ही पेटीत सकाळी जिल्हा परिषद शाळेच्‍या आवारात सापडली. मात्र त्‍यातील 20 हजार रुपये रोख व कागदपत्रे चोरून नेलेली होती.