भारतीय किसान संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव द्यावा, अशी मागणी भारतीय किसान संघाने पंतप्रधानांना केली आहे. भारतीय किसान संघाने आज, ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना साहित्य पुरवणारा, शेतकऱ्यांचा माल खरेदी करणारा व्यापारी सर्वच जण करोडपती होत आहेत. मात्र शेतकरी का कर्जबाजारी …
 
भारतीय किसान संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव द्यावा, अशी मागणी भारतीय किसान संघाने पंतप्रधानांना केली आहे. भारतीय किसान संघाने आज, ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांना साहित्य पुरवणारा, शेतकऱ्यांचा माल खरेदी करणारा व्यापारी सर्वच जण करोडपती होत आहेत. मात्र शेतकरी का कर्जबाजारी होत आहे? असा सवाल भारतीय किसान संघाने पंतप्रधानांना निवेदनाद्वारे विचारला आहे. शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित अधिकचा भाव दिला तरच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष मुकुंदराव भिसे, प्रांत महामंत्री बाबाराव देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रशांत गुप्ता, सुरेंद्र गावंडे, जिल्हा मंत्री कैलास ढोले, राजेंद्र जाधव, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार खडके, मुकुंदराव वानखेडे, अर्जुनराव गारोडे यांच्यासह भारतीय किसान संघाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.