भारत- पाकिस्तानदरम्यान रंगणार पुन्हा क्रिकेटचा थरार?

पाकिस्तानी माध्यमांनी केला दावा; वर्षाखेरीस होणार टी-२० सामनेइस्लामाबाद : भारत- पाकिस्तानच्या संघादरम्याना क्रिकेटच्या मैदानावरील हायहोल्टेज ड्रामा सर्वश्रूत आहे. या दोन शेजारी देशांदरम्यान क्रिकेटचा सामना होणार असेल तर क्रिकेटप्रेमी श्वास रोखून तो पाहत असतात. परंतु दहशतवादाच्या मुद्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे बंद केल्याने क्रिकेटचा हा मैदानावरील थरार रंगणे बंद झाले.पण आता दोन्ही देशांदरम्यान क्रिकेटचे सामने …
 

पाकिस्तानी माध्यमांनी केला दावा; वर्षाखेरीस होणार टी-२० सामने
इस्लामाबाद :
भारत- पाकिस्तानच्या संघादरम्याना क्रिकेटच्या मैदानावरील हायहोल्टेज ड्रामा सर्वश्रूत आहे. या दोन शेजारी देशांदरम्यान क्रिकेटचा सामना होणार असेल तर क्रिकेटप्रेमी श्वास रोखून तो पाहत असतात. परंतु दहशतवादाच्या मुद्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे बंद केल्याने क्रिकेटचा हा मैदानावरील थरार रंगणे बंद झाले.पण आता दोन्ही देशांदरम्यान क्रिकेटचे सामने पुन्हा होऊ शकतात.इतकेच नव्हे तर या वर्षाखेरीस तीन सामन्यांची टी-२० मालिकाही खेळवली जाण्याची शक्यता आहे. तसा दावा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केला आहे. सर्व काही सुरळीत व नियोजनाप्रमाणे पार पडल्यास यावर्षाखेरीस क्रिकेटचा थरार पुन्हा सुरू होईल, असे या वृत्तात म्हटले आहे.
पाकिस्तानातील ‘डेली जंग‘ या आघाडीच्या उर्दू दैनिकाने पाकिस्तानी क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या अधिकार्‍याच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आम्हाला द्विपक्षीय मालिकेसाठ तयार राहण्यास सांगण्यात आले असून आम्ही तयारी सुरू केली आहेऋ दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय मालिकेची चर्चा भारतीय माध्यमांमध्येही सुरू आहेऋ सर्व काही ठीक झाले तर क्रिकेटप्रेमीच्या या हॉटफेव्हरीट दोन्ही संघांदरम्यान तीन टी-२० सामन्यांची मालिका या वर्षाच्या दुसर्‍या सत्रात खेळवली जाऊ शकते. पण या अधिकार्‍याने त्याचे नाव सांगण्यास नकार दिला. भारत-पाकदरम्यान गेल्या दहा वर्षांपासून क्रिकेटचे सामने झालेले नाहीत. भारत-पाक यांच्यात २००७ दरम्यान अखेरची क्रिकेट मालिका झाली होती. २००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर द्विपक्षीय संबंध बिघडले. त्यामुळे क्रिकेट मालिकाही बंद झाल्या. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान अपवादानेच क्रिकेट सामने खेळले गेले आहेत. आता आगामी टी-२० वर्ल्डकपच्या अनुषंगाने हे संघ आमने-सामने येण्याची शक्यता आहे.