भावाचा भावावरच जीवघेणा हल्ला, भाऊ फक्‍त एवढंच म्‍हटला होता की…; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (अजय राजगुरे) ः विहिरीत दगडं टाकत असल्याने समजविण्यास गेलेल्या भावावरच भावाने जीवघेणा हल्ला चढवला. दगडाने मारहाण करत खाली पाडून नंतर लाकडाने मारले. यात 61 वर्षीय भाऊ जखमी झाला आहे. त्यांच्यावर सध्या बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना कोलवड (ता. बुलडाणा) येथे 2 एप्रिलला सकाळी 8 च्या सुमास घडली. बाबुराव भाऊराव …
 

बुलडाणा (अजय राजगुरे) ः विहिरीत दगडं टाकत असल्याने समजविण्यास गेलेल्या भावावरच भावाने जीवघेणा हल्ला चढवला. दगडाने मारहाण करत खाली पाडून नंतर लाकडाने मारले. यात 61 वर्षीय भाऊ जखमी झाला आहे. त्‍यांच्‍यावर सध्या बुलडाणा येथील जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना कोलवड (ता. बुलडाणा) येथे 2 एप्रिलला सकाळी 8 च्‍या सुमास घडली.

बाबुराव भाऊराव जाधव (६१, रा. कोलवड) असे जखमीचे नाव असून, त्‍यांना बाजीराव भाऊराव जाधव (५०, रा. कोलवड) याने मारहाण केली आहे. बाबुराव जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली,  की कोलवड गट क्र. ३७१ मध्ये १ एकर जमीन आहे. त्यातच भावाच्या शेतामध्ये सामाईक विहीर आहे. दोघे सोबत पाणी वापरतात. सकाळच्या सुमारास पाणी पाहण्यासाठी ते गेले असता बाजीराव विहिरीवर उभा राहून त्यात दगडं टाकत होता. त्यावेळी बाबुराव यांनी त्यास विचारले की, असे का करत आहेत. कष्टाने विहीर केलेली का बुजवत आहे. त्‍यामुळे संतापलेल्या बाजीरावने त्‍यांना दगडाने डोक्यावर, डोळ्यावर मारहाण केली. ते खाली पडले असता लाकडाने  मारहाण केली. तपास महिला पोलीस हेड कॉन्‍स्‍टेबल कोकिला तोमर करत आहेत.