भावी अधिकाऱ्यांची जिल्हा कचेरीसमोर निदर्शने, एमपीएससी रद्दचा केला निषेध; ‘बुलडाणा लाईव्ह’ने वेधले होते लक्ष

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा भावी अधिकारी अर्थात परीक्षा उमेदवारांनी येथे तीव्र निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या प्रतिकात्मक आंदोलनात उमेदवार, विद्यार्थी, स्वाभिमाना शेतकरी संघटनेचे युवा नेते राणा चंदन सहभागी झाले. बुलडाणा लाईव्हने आज गुरुवारी यासंदर्भातील वृत्त प्रसारित करून हजारो उमेदवारांच्या भावनांना वाचा फोडली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, 11 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्‍या निर्णयाचा भावी अधिकारी अर्थात परीक्षा उमेदवारांनी येथे तीव्र निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या प्रतिकात्मक आंदोलनात उमेदवार, विद्यार्थी, स्वाभिमाना शेतकरी संघटनेचे युवा नेते राणा चंदन सहभागी झाले. बुलडाणा लाईव्हने आज गुरुवारी यासंदर्भातील वृत्त प्रसारित करून हजारो उमेदवारांच्या भावनांना वाचा फोडली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, 11 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता आयोजित या आंदोलनात बोलताना काही उमेदवारांनी आपल्या भावना तीव्रतेने व्यक्त केल्या. आघाडी सरकारने परीक्षा पुढे ढकलून चुकीचा निर्णय घेतला आहे. परीक्षा वेळेवरच होतील असे सांगणाऱ्या सरकारने आपला निर्णय फिरविला, असा आरोप चंदन यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी दंगा काबू पथकही तैनात करण्यात आले होते.