भास्कर पेरे पाटील, डॉ. श्रीपाल सबनीस, उत्तम कांबळे आज विवेकानंद जन्मोत्सवात!; विवेकानंद जन्मोत्सवाचे थेट प्रक्षेपण बुलडाणा लाइव्हवर…; काल 1 लक्ष वाचकांनी अनुभवला सोहळा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विवेकानंद जयंती महोत्सवाचा आज, 3 फेब्रुवारीला दुसरा दिवस असून, दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दिवसभरातील कार्यक्रमांचे बुलडाणा लाइव्हवर थेट प्रक्षेपण होणार असून, वाचकांना या बातमीच्या खालील व्हिडिओद्वारे किंवा www.buldanalive.com थेट वर भेट देऊन कार्यक्रमांचा लाभ घेता येणार आहे. हा सोहळा कोरोनामुळे केवळ ऑनलाइन होत असून, काल बुलडाणा लाइव्हने केलेले थेट …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विवेकानंद जयंती महोत्सवाचा आज, 3 फेब्रुवारीला दुसरा दिवस असून, दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दिवसभरातील कार्यक्रमांचे बुलडाणा लाइव्हवर थेट प्रक्षेपण होणार असून, वाचकांना या बातमीच्या खालील व्हिडिओद्वारे किंवा www.buldanalive.com थेट वर भेट देऊन कार्यक्रमांचा लाभ घेता येणार आहे. हा सोहळा कोरोनामुळे केवळ ऑनलाइन होत असून, काल बुलडाणा लाइव्हने केलेले थेट प्रक्षेपण तब्बल 1 लाखहून अधिक भक्तांनी पाहिले.
दुपारी 2 वाजता अखिल मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस व्याख्यान सादर करणार आहेत. आपल्या वेगळ्या वक्तृत्वशैलीने लोकांना खेळवून ठेवणारे ग्रामोन्नतीचा मार्ग सुकर करणारे आदर्श ग्राम पाटोदाचे निर्माते भास्कर पेरे पाटील यांचे दुपारी 3.30 वाजता व्याख्यान होणार आहे. पुणे येथील ख्यातनाम कीर्तनकार अनेक संगीत नाटकात लीलया भूमिका करणारे संत साहित्याचे अभ्यासक डॉ. चारूदत्त आफळे यांचे रामदासी किर्तन होणार आहे. त्यानंतर सुप्रसिध्द विचारवंत, लेखक, ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे सायंकाळी 7 वाजता श्रोत्यांना मार्गदर्शन करतील. सायंकाळी 8.30 ते 10 वाजता सुप्रसिध्द कीर्तनकार हभप संजय महाराज पाचपोर महाराज कीर्तन सादर करतील. आपण घरी राहूनच ऑनलाइन पध्दतीने या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विवेकानंद आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.

विवेकानंद जन्मोत्सव पहा ऑनलाइन :