खामगाव : भीषण अपघातातही 6 जणांना नशिबाने तारले!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव कार उभ्या ट्रकला धडकली. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी… कारमधील सहाही जणांचे प्राण वाचले असून, जखमी झाल्याने त्यांना आधी खामगाव आणि नंतर औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आज, 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 च्या सुमारास हा अपघात घडला.खामगाव येथील प्रिंटवेल ऑफसेटचे संचालक …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव कार उभ्या ट्रकला धडकली. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी… कारमधील सहाही जणांचे प्राण वाचले असून, जखमी झाल्याने त्यांना आधी खामगाव आणि नंतर औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आज, 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 च्या सुमारास हा अपघात घडला.
खामगाव येथील प्रिंटवेल ऑफसेटचे संचालक प्रवीण माळी व जैन कुटुंब औरंगाबादकडून खामगाव येथे येत होते. अंत्रज फाट्याजवळ चालकाला अंदाज न आल्याने उभ्या ट्रकला त्यांची कार धडकली. यात प्रवीण माळी (52), सौ. स्वाती माळी (45), सुहानी जैन (17), हेमानी आनंद जैन (15), आनंद रमेशचंद्र जैन (45), प्रीती आनंद जैन (40, सर्व रा. फरशी, खामगाव) जखमी झाले. सर्व जखमींवर खामगाव येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.