भीषण अपघात : लक्‍झरी बसने ॲपेचा धडक; युवक ठार; आई-छोट्या भावाचा आधार हरपला; चिखली तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लक्सरी बसने ॲपेला उडवले. गंभीर जखमी झालेल्या ॲपेचालक युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज, 13 मार्चच्या सकाळी 8 च्या सुमारास चिखली- खामगाव मार्गावरील पेठ (ता. चिखली) येथे घडली. किशोर गजानन इंगळे (24, रा. उत्रादा, ता. चिखली) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. पहा कसा झाला अपघात… किशोरने गहू चाळणी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लक्सरी बसने ॲपेला उडवले. गंभीर जखमी झालेल्या ॲपेचालक युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज, 13 मार्चच्‍या सकाळी 8 च्‍या सुमारास चिखली- खामगाव मार्गावरील पेठ (ता. चिखली) येथे घडली. किशोर गजानन इंगळे (24, रा. उत्रादा, ता. चिखली) असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

पहा कसा झाला अपघात…

किशोरने गहू चाळणी करण्याचे यंत्र घेतले होते. ते यंत्र त्याने ॲपेला जोडले होते. आज सकाळी तो पेठ येथे यंत्र घेऊन येत होता. दरम्यान पुण्यावरून नागपूरकडे जाणाऱ्या लक्सरी बसने त्याला उडवले. त्यात अॅपे उलटला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. लगेच त्याला उपचारासाठी चिखली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  किशोर होतकरू आणि घरातील कर्ताधर्ता होता. किशोरच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाल्याने आई आणि छोट्या भावाचा तोच आधार होता. या अपघाताने तो आधारच हरवला.