भूषण अहिरे यांनी स्वीकारली सिंदखेडराजा “एसडीओ’ पदाची सूत्रे; लोकाभिमुख, पारदर्शक कारभाराला देणार प्राधान्य

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन अधिकारी म्हणून प्रभावी कामगिरी बजावणारे भूषण अहिरे यांनी आज, २२ सप्टेंबरला मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या उपविभागीय अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी प्रसिद्धी माध्यमाशी अनौपचारिकपणे बोलताना त्यांनी आपण लोकाभिमुख व पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. सकाळी अहिरे यांनी एकतर्फी पदभार सांभाळला. यावेळी त्यांचे अधिनस्थ अधिकारी व …
 
भूषण अहिरे यांनी स्वीकारली सिंदखेडराजा “एसडीओ’ पदाची सूत्रे; लोकाभिमुख, पारदर्शक कारभाराला देणार प्राधान्य

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन अधिकारी म्हणून प्रभावी कामगिरी बजावणारे भूषण अहिरे यांनी आज, २२ सप्‍टेंबरला मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या उपविभागीय अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी प्रसिद्धी माध्यमाशी अनौपचारिकपणे बोलताना त्यांनी आपण लोकाभिमुख व पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

सकाळी अहिरे यांनी एकतर्फी पदभार सांभाळला. यावेळी त्यांचे अधिनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. यानंतर त्यांनी लगेच कामाला सुरुवात करीत कार्यालयीन कामकाजाचा प्राथमिक आढावा घेतला. कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या कामाला प्राधान्य देतानाच झिरो पेंडन्‍सीचे धोरण बाळगावे, अशा अनौपचारिक सूचना त्यांनी केल्या. सन २०१२ मध्ये माहिती तंत्रज्ञानामधून बी. ई. झाल्यावर त्यांनी स्पर्धा परीक्षेचे खडतर आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये त्यांची मंत्रालय डेस्क ऑफिसर म्हणून निवड झाली.

सन २०१६-१७ मध्ये उपजिल्हाधिकारी पदासाठीच्या परीक्षेत ते महाराष्ट्र राज्यातून प्रथम आले होते. परिविक्षाधीन कार्यकाळ संपल्यावर त्यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी आपल्या कार्यकाळात जिगाव प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मोबदला मिळवून दिला. त्यांच्या संकल्पनेतून जिल्हा कचेरीत लवकरच स्वनिधीतून साकारणारी भूसंपादन विभागाची भव्य प्रशासकीय इमारत त्यांच्या कर्तृत्वची साक्ष ठरली आहे.