मका विकायचा तर बारदानाही आणा; ‘नाफेड’च्‍या अजब अटीने शेतकरी हवालदिल!; सिंदखेड राजात शिवसेनेकडून संताप

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा येथे नाफेडमार्फत मका खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना बारदानाही पुरवावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा नाहक भुर्दंड सोसावा लागणार आहे. ही अट रद्द करावी, अशी मागणी सहायक निबंधक व तहसीलदारांकडे तालुका शिवसेनेने केली आहे. सिंदखेड राजा कृषी उत्पन्न बाजार समितीत होणाऱ्या मका खरेदीत शेतकऱ्यांवर भुर्दंड लादून …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा येथे नाफेडमार्फत मका खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना बारदानाही पुरवावा लागणार आहे. त्‍यामुळे शेतकऱ्यांना हा नाहक भुर्दंड सोसावा लागणार आहे. ही अट रद्द करावी, अशी मागणी सहायक निबंधक व तहसीलदारांकडे तालुका शिवसेनेने केली आहे.

सिंदखेड राजा कृषी उत्पन्न बाजार समितीत होणाऱ्या मका खरेदीत शेतकऱ्यांवर भुर्दंड लादून वेठीस धरले जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून वारंवार येत आहे. मकासोबत प्रति 50 किलोसाठी एक बारदाना पोते असा पुरवठा करावा, अशी अट घातली गेल्याने प्रतिक्विटंल दोन पोते त्याची किंमत बारदाना 30 रुपये प्रति पोते म्हणजेच प्रतिक्विटंल 60 रुपये एवढा भुर्दंड शेतकऱ्याला स्वतः सहन करावा लागत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील ताडशिवणी येथील शेतकरी व तालुक्यातील इतर गावांसह इतरही ठिकाणी मका पिकाचे उत्पादन होत असून 25 प्रतिक्विटंल मका विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्याला जवळपास पंधराशे रुपये अगोदर तोटा सहन करावा लागत आहे. अगोदरच कोरोना संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांची अशी पिळवणूक करण्यात येत आहे. ही जाचक अट त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख शिवप्रसाद ठाकरे, गजेंद्र देशमुख, लखन देशमुख यांनी केली आहे.