मतदानाच्या दिवशी पळसखेड नाईकमध्ये ‘ती’ भीती!; एसपींसह निवडणूक अधिकार्‍यांना दिली कल्पना!; पोलीस बलाची मागणी, खर्च देण्याचीही तयारी!!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मतदान सुरू असताना दुपारी तीन-चार नंतर उमेदवारांच्या प्रतिनिधींची आरोग्य तपासणी करावी. कारण ते मद्यपान केलेले असू शकतात, असा थेट आरोप करत उमेदवारांसह हे त्यांचे प्रतिनिधी मतदारांना धमकावून गोंधळ घालू शकतात, अशी भीती अखिल भारतीय बंजारा सेनेने व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व तहसील निवडणूक …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मतदान सुरू असताना दुपारी तीन-चार नंतर उमेदवारांच्या प्रतिनिधींची आरोग्य तपासणी करावी. कारण ते मद्यपान केलेले असू शकतात, असा थेट आरोप करत उमेदवारांसह हे त्यांचे प्रतिनिधी मतदारांना धमकावून गोंधळ घालू शकतात, अशी भीती अखिल भारतीय बंजारा सेनेने व्यक्त केली आहे.

यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व तहसील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. तालुक्यातील पळसखेड नाईक येथे निवडणुकीच्या दिवशी व्यसनाधीन लोकांकडून या अगोदर अनेकवेळा अनुचित प्रकार घडलेले आहेत. इतकेच नाही तर चक्क मतदान केंद्रावर उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी सुद्धा नशापाणी करून मतदारांना धमकावून गोंधळ घालतात. या प्रकारामुळे गावातील शांतता भंग होते म्हणून प्रशासनाने मतदान केंद्रावरील मतदान प्रतिनिधींचे दुपारी 3-4 दरम्यान आरोग्य परीक्षण करावे व मद्यपान केलेले आढळल्यास त्या मतदान प्रतिनिधी व त्या उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, असे निवेदनात म्हटले आहे. मतदानाच्या दिवशी पळसखेड नाईक गावात अतिरिक्त पोलीस बल तैनात करण्यात यावे. त्यासाठी लागणारा खर्च सुद्धा देण्याची तयारी निवेदन देणार्‍यांनी दर्शविली आहे. गावात शांतता राहावी व शांती भंग करणार्‍यांवर कडक कावाई करण्याची मागणी अखिल भारतीय बंजारा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेश राठोड यांनी केली आहे.