मतदानासाठी कामगाराला भरपगारी सुटी द्यावीच लागणार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारी रोजी होत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी मंजूर करण्यात आली आहे. खासगी असो की सरकारी आस्थापनांना या दिवशी आपल्या कर्मचार्यांना मतदानासाठी सुटी द्यावीच लागणार आहे. निवडणूक होणार्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार तसेच निवडणूक होणार्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या क्षेत्रात औद्योगिक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारी रोजी होत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी मंजूर करण्यात आली आहे. खासगी असो की सरकारी आस्थापनांना या दिवशी आपल्या कर्मचार्‍यांना मतदानासाठी सुटी द्यावीच लागणार आहे.

निवडणूक होणार्‍या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार तसेच निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतींच्या लगतच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती आहेत. अशा ठिकाणी नोकरी निमित्ताने कामास येणार्‍या संबंधित ग्रामपंचायतीमधील उमेदवारांना मतदानाचा हक्क बजावता यावा. यादृष्टीने अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी, विशेष सवलत देण्यात यावी. त्या दिवशी बंद राहिलेल्या दुकाने, आस्थापनामधील कर्मचार्‍यांच्या वेतनातून कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये, असे आदेश राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकार्‍यांनी जारी केले आहेत. शासन निर्णयाचे पालन न केल्यास आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. याबाबत सरकारी कामगार अधिकारी कार्यालय येथे मतदानाच्या कालावधीत दक्षता कक्ष स्थापन करण्यात आलेला असून अनुषंगीक बाबतीत काही तक्रार असल्यास संबंधित कामगारांनी संपर्क साधावा, असे कामगार अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.