मतदानासाठी निर्धास्त राहा… जलंब पोलिसांच्या पथसंचलनाने ग्रामस्थ आश्‍वस्त!

जलंब (संतोष देठे पाटील) ः ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलंब पोलिसांनी गावात पथसंचलन करत मतदारांना आश्वस्त करत मतदानासाठी उत्साहाने घराबाहेर पडण्याचे आवाहन केले. 15 जानेवारीला ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गावातील शांतता कायम राहावी, शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पाडावे यासाठी कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह …
 

जलंब (संतोष देठे पाटील) ः ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जलंब पोलिसांनी गावात पथसंचलन करत मतदारांना आश्‍वस्त करत मतदानासाठी उत्साहाने घराबाहेर पडण्याचे आवाहन केले. 15 जानेवारीला ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गावातील शांतता कायम राहावी, शांततापूर्ण वातावरणात मतदान पार पाडावे यासाठी कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी प्रयत्नरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जलंबचे ठाणेदार पी. आर. इंगळे यांनी 12 जानेवारी रोजी सकाळी जलंब, माटरगाव, पहुरजीरा या लोकसंख्या बहुल गावांत पोलीस पथसंचलन केले. दरम्यान जलंब येथे बहुसंख्य पोलीस तैनात पाहता जणू छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पथसंचलनास ठाणेदार श्री. इंगळे, पीएसआय राहूल कातकडे, आरसीपी पथक व सर्व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.