मद्यधुंद ट्रॅक्‍टरचालकाचा प्रताप… तीन दुचाकींना उडवत झाडाला धडकले; बुलडाणा शहरातील घटना, सुदैवाने जीवित हानी टळली!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगावातील टँकरचालकाचा प्रताप विस्मृतीत न जातो तोच बुलडाणा शहरातही तसाच प्रकार समोर आला आहे. मद्यधुंद ट्रॅक्टरचालकाने 3 मोटारसायकलींना उडवले. ही घटना बुलडाणा शहरातील संभाजीनगरात 2 मेच्या दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. घटनेत कुणी जखमी झाले नसले तरी मोठे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू असताना मद्यधुंद चालक ताब्यातील ट्रॅक्टर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः खामगावातील टँकरचालकाचा प्रताप विस्‍मृतीत न जातो तोच बुलडाणा शहरातही तसाच प्रकार समोर आला आहे. मद्यधुंद ट्रॅक्‍टरचालकाने 3 मोटारसायकलींना उडवले. ही घटना बुलडाणा शहरातील संभाजीनगरात 2 मेच्‍या दुपारी साडेतीनच्‍या सुमारास घडली. घटनेत कुणी जखमी झाले नसले तरी मोठे नुकसान झाले आहे.

विजांच्‍या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू असताना मद्यधुंद चालक ताब्‍यातील ट्रॅक्‍टर पावसाचा आनंद घेत संभाजीनगरमधून बेधुंदपणे भरधाव पळवत होता. यातच त्‍याचा ताबा सुटला. त्‍याने घरासमोर उभ्या 3 दुचाकींना धडक देत मनोज नांदरेकर यांच्‍या घरासमोरील करंजीच्‍या झाडाला ठोस दिली. मनोज नांदरेकर, राजू मिसाळ यांच्‍या दुचाकींसह अन्य एका ॲक्‍टिव्‍हा गाडीचे एकूण 50-60 हजारांचे यात नुकसान झाले आहे.  घटनेनंतर लोकांनी पोलीस ठाण्यात पोहोचून ट्रॅक्‍टरचालकाची माहिती दिली. त्‍यानंतर ट्रॅक्‍टरमालक विलास शिरसाट यांच्‍या ट्रॅक्‍टरवरील चालक लक्ष्मण मोरे याच्‍यावर कारवाई करण्यात आली.