मधमाशांच्‍या हल्ल्यात एसटी चालकाचा मृत्‍यू; गोमेधरवर शोककळा

जानेफळ (अनिल मंजूळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मधमाशांच्या हल्ल्यात गोमेधर (ता. मेहकर) येथील एसटी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शिर्ला नेमाणे (ता. खामगाव) येथे आज, 21 मार्चला दुपारी 3 च्या सुमारास घडली.विलास चव्हाण (26) असे मृत्यू झालेल्या एसटी चालकाचे नाव आहे. चव्हाण हे मेहकर आगारात कार्यरत होते. कामगार सेनेचे ते पदाधिकारी होते. सूत्रांच्या माहितीनुसार, जावळाच्या …
 

जानेफळ (अनिल मंजूळकर ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मधमाशांच्‍या हल्ल्यात गोमेधर (ता. मेहकर) येथील एसटी चालकाचा मृत्‍यू झाल्याची घटना शिर्ला नेमाणे (ता. खामगाव) येथे आज, 21 मार्चला दुपारी 3 च्‍या सुमारास घडली.
विलास चव्‍हाण (26) असे मृत्‍यू झालेल्या एसटी चालकाचे नाव आहे. चव्‍हाण हे मेहकर आगारात कार्यरत होते. कामगार सेनेचे ते पदाधिकारी होते. सूत्रांच्‍या माहितीनुसार, जावळाच्‍या कार्यक्रमासाठी शिर्ला नेमाणे येथे चव्‍हाण हे संजय राठोड, श्याम देशमुख, श्री. म्‍हस्‍के या आपल्या मित्रांसह गेले होते. शिर्ला नेमाणेजवळ त्‍यांच्‍यावर अचानक मधमाशांनी हल्ला चढवला. यात गंभीर जखमी झालेल्या चव्‍हाण यांच्‍यासह त्‍यांच्‍या मित्रांना खामगावला हलविण्यात आले. उपचारादरम्‍यान चव्‍हाण यांचा मृत्‍यू झाला. अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. चव्‍हाण यांच्‍या पश्चात पत्‍नी, दोन मुली, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. चव्‍हाण यांच्‍या निधनामुळे त्‍यांचे मित्रपरिवार आणि गावात शोककळा पसरली आहे.