मध्यरात्रीची ‘शाळा’…मोटारसायकलवर 16 वर्षीय मुलीला पहाटे 2 वाजता पळवले!; खामगाव तालुक्‍यातील प्रकार

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मध्यरात्री पहाटे 2 च्या सुमारास 16 वर्षीय मुलीला मोटारसायकलवर पळवून नेल्याची घटना पिंपळगाव नाथ (ता. खामगाव) येथे समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शरद कैलास पोपळघट असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याचा संशय मुलीच्या …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मध्यरात्री पहाटे 2 च्‍या सुमारास 16 वर्षीय मुलीला मोटारसायकलवर पळवून नेल्याची घटना पिंपळगाव नाथ (ता. खामगाव) येथे समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्‍या वडिलांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शरद कैलास पोपळघट असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्‍याने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी व्‍यक्‍त केला आहे.  तक्रारीत म्‍हटले आहे, की 17 मार्च रोजी सहकुटुंब घरात झोपलो असताना पहाटे 2 वाजेदरम्यान घराबाहेर मोटरसायकलीचा आवाज ऐकू आला. त्‍याचवेळी घरात मुलगी झोपलेली दिसली नाही. घरातून बाहेर जाऊन पाहिले तर काही अंतरावर पिंपळाच्या झाडाखाली मोटरसायकल उभी दिसली. त्या मोटरसायकलीजवळ शरद उभा दिसला. आम्ही त्याच्‍याजवळ जाणार तोच त्याठिकाणावरून तो मोटारसायकल घेऊन पळून गेला. तेव्हापासून आम्ही मुलीचा शोध घेतला पण ती कुठेच मिळून आली नाही. शरदही गावात कुठेच दिसला नाही. शरद पोपळघट यानेच माझ्या मुलीस फूस लावून मोटरसायकलीवर पळवून नेले आहे, असे मुलीच्‍या पित्‍याने तक्रारीत म्‍हटले आहे. पिंपळगाव राजा पोलीस आता मुलगी आणि शरदचा शोध घेत आहेत.