मध्यरात्री जुगार रंगला; ‘एलसीबी’ने केला बेरंग; साखरखेर्डा येथील क्‍लबवर कारवाई, 15 जुगारी ताब्‍यात, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जुगाराचा डाव रंगात आला असतानाच छापा मारून पोलिसांनी बेरंग केला. 15 जुगाऱ्यांना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून 10 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज, 27 मार्चला पहाटे 2 च्या सुमारास साखरखेर्डा- लव्हाळा रस्त्यावरील शेत शिवारात करण्यात आली. साखरखेर्डा येथे जुगाराचा …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जुगाराचा डाव रंगात आला असतानाच छापा मारून पोलिसांनी बेरंग केला. 15 जुगाऱ्यांना बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून 10 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज, 27 मार्चला पहाटे 2 च्या सुमारास  साखरखेर्डा- लव्हाळा रस्त्यावरील शेत शिवारात करण्यात आली.

साखरखेर्डा येथे जुगाराचा मोठा क्लब सुरू असल्याची माहिती स्‍थानिक गुन्‍हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने साखरखेर्डा गावाजवळील शेतात छापा मारला. शेतातील पक्क्या खोलीत जुगार सुरू असताना 15 जणांना रंगेहात पकडण्यात आले. विष्णू सुधाकर गायकवाड (34), शुभम दिलीपींग दभैये ( 27) , ऋतिक मोतीराम गायकवाड (19), अमजदखान आमनउल्ला खान (45), शे.आरीफ शे.कादर (32), प्रविण आसाराम पाझडे (37), अब्रार शहा फकरू शहा (31), ब्रह्मानंद सुधाकर गायकवाड ( 25, सर्व रा.साखरखेर्डा, किसन आत्माराम अवचार (36), श्रीकृष्ण राजू गवई (26, दोघे रा. वडगाव माळी,ता मेहकर, विलास रमेश प-हाड (29 ) रा. सिंदखेडराजा, राजू मुरलीधर दहातोंडे (32, रा. लोणार), ऋषीकेश अभिमन्यू मुळे (19), सुभाष भास्कर मुळे (30, दोघे रा. उदनापूर), संतोष लक्ष्मन आंभोर (29, रा. बोरखेडी) व राजू सुकलाल बशिरे ( 44, रा. अंजनी खुर्द) यांचा समावेश आहे. आरोपींकडून नगदी 42400 रुपये, 7 मोटर सायकली, एक बोलेरो व 15 मोबाईल असा एकूण 10 लाख 5 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस कर्मचारी आताउल्ला खान, श्रीकृष्ण चांदूरकर, गजानन आहेर, पंकज मेहेर, विजय सोनोने, संभाजी असोलकर, श्रीकांत चिंचोले, गजानन गोरले, वैभव मगर, सुभाष वाघमारे, चालक पोकाँ सुधाकर  बर्डे व रवी भिसे यांनी केली.