मध्यरात्री दीडला ‘भिंगरी’ घेऊन येत होता, पोलिसांनी हटकल्याने फुटले बिंग; मेहकर तालुक्‍यातील कारवाईत लाखाचा मुद्देमाल जप्‍त

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देशी दारूच्या भिंगरी कंपनीचे 4 बॉक्स घेऊन येताना डोणगावच्या (ता. मेहकर) आरेगाव चौकात पोलिसांनी मोटारसायकल अडवून विचारणा केली. तेव्हा बॉक्समध्ये 192 शिशा मिळून आल्या. आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून 1 लाख 13 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज, 3 जून रोजी पहाटे दीडच्या सुमारास करण्यात …
 
मध्यरात्री दीडला ‘भिंगरी’ घेऊन येत होता, पोलिसांनी हटकल्याने फुटले बिंग; मेहकर तालुक्‍यातील कारवाईत लाखाचा मुद्देमाल जप्‍त

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देशी दारूच्‍या भिंगरी कंपनीचे 4 बॉक्‍स घेऊन येताना डोणगावच्‍या (ता. मेहकर) आरेगाव चौकात पोलिसांनी मोटारसायकल अडवून विचारणा केली. तेव्हा बॉक्‍समध्ये 192 शिशा मिळून आल्या. आरोपीला ताब्‍यात घेतले असून, त्‍याच्‍याकडून 1 लाख 13 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला आहे. ही कारवाई आज, 3 जून रोजी पहाटे दीडच्‍या सुमारास करण्यात आली.

एएसआय अशोक झोरे यांनी या प्रकरणात तक्रार दिली असून, त्‍यावरून सुनिल शिवाजी गव्हाणे (29, रा. बिबखेड ता.रिसोड जि. वाशिम) याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. आरेगाव चौकात नाकेबंदी दरम्‍यान सुनील आज पहाटे (मध्यरात्री) दीडला मोटारसायकलवरून देशी दारूचे बॉक्‍स घेऊन येताना डोणगाव पोलिसांना दिसला. त्‍यांनी त्‍याला थांबवून चौकशी केली. तेव्‍हा त्‍याच्‍याकडे 13 हजार 440 रुपयांच्‍या देशी दारूच्‍या बाटल्‍या मिळून आल्या. यासह त्‍याची विनानंबरची पल्सर मोटारसायकल 1 लाख रुपयांची जप्‍त करण्यात आली. तपास एएसआय झोरे करत आहेत.

शेगावमध्येही ‘देशी’ घेऊन जाणाऱ्या तरुणावर कारवाई
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोटारसायकलवर देशी दारू घेऊन जाणाऱ्या तरुणाला शेगाव शहर पोलिसांनी २ जून रोजी रात्री पकडले. त्‍याच्‍याकडून दुचाकीसह ६१ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ठाणेदार संतोष टाले यांना माहिती मिळाली, की मंगेश देवराव तायडे (२६, रा. तीन पुतळा परिसर शेगाव) हा दुचाकीवर देशी दारूची वाहतूक करत आहे. या माहितीवरून ठाणेदार श्री. टाले यांच्यासह त्यांच्या पथकातील पीएसआय योगेश कुमार दंदे, विजय साळवे, उमेश बोरसे व इतर सहकाऱ्यांनी पशु चिकित्सालयाजवळ रात्री ८:३० वाजेदरम्यान सापळा रचला. यावेळी आरोपी दुचाकीवर विना मास्क येताना मिळून आला. त्याला थांबवून तपासणी केली असता त्याच्याजवळच्‍या पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये देशी दारू टॅंगो पंच कंपनीच्या ९० एमएल मापाच्या ४० बॉटल किंमत १ हजार ४० रुपये मिळून आल्‍या. यावेळी पोलिसांनी मोटर सायकल (किंमत ६० हजार रुपये) ४० नग देशी दारूच्या बॉटल (किंमत १०४० रुपये) व पांढऱ्या रंगाची गोणी (किंमत ५० रुपये) असा एकूण ६१ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कॉन्स्टेबल विजय साळवे यांच्या फिर्यादीवरून मंगेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय योगेश कुमार दंदे करत आहेत.