मध्यरात्री शैक्षणिक कागदपत्रे घेऊन तरुणी घरातून निघून गेली…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन कुणाला काहीही न सांगता 21 वर्षीय तरुणी घरातून निघून गेली आहे. ही घटना अंत्री खेडेकर (ता. चिखली) येथे समोर आली आहे.दीक्षा सुरेश मोरे (21) असे या तरुणीचे नाव असून, पदवीचे शिक्षण घेत होती. 15 जानेवारीला घरात सर्व जण झोपलेले असताना ती तिची शैक्षणिक कागदपत्रे घेऊन निघून …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन कुणाला काहीही न सांगता 21 वर्षीय तरुणी घरातून निघून गेली आहे. ही घटना अंत्री खेडेकर (ता. चिखली) येथे समोर आली आहे.
दीक्षा सुरेश मोरे (21) असे या तरुणीचे नाव असून, पदवीचे शिक्षण घेत होती. 15 जानेवारीला घरात सर्व जण झोपलेले असताना ती तिची शैक्षणिक कागदपत्रे घेऊन निघून गेली. घरच्यांनी नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. अखेर आज, 23 जानेवारीला मुलीच्या नातेवाईकांनी अंढेरा पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली आहे. गोरा रंग, सडपातळ बांधा, 5 फूट 6 इंच उंची, अंगात लाल पंजाबी ड्रेस अशा वर्णनाची मुलगी दिसल्यास अंढेरा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.