मध्यरात्री 12 ला ती घरी बाहेर पडली, पतीने आवाज दिला…पण ती अंधारात गायब झाली!; मलकापूर तालुक्‍यातील घटना; जिल्ह्यात 8 दिवसांत 14 मुली-महिला बेपत्ता!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मध्यरात्री 12 ला ती घराबाहेर पडली… पतीने आवाज दिला, पण तिने वळूनही पाहिले नाही.. अंधारात गायब झाली… हे कोणत्या भयावह सिनेमातील दृश्य नाही तर मलकापूर तालुक्यातील हिंगणा काझी गावात घडलेली सत्य घटना आहे. नवीनच लग्न झालेली 21 वर्षीय तरुणी अशा पद्धतीने गायब झाल्याने तिच्या पतीलाही धक्का बसला आहे. या प्रकरणात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मध्यरात्री 12 ला ती घराबाहेर पडली… पतीने आवाज दिला, पण तिने वळूनही पाहिले नाही.. अंधारात गायब झाली… हे कोणत्‍या भयावह सिनेमातील दृश्य नाही तर मलकापूर तालुक्‍यातील हिंगणा काझी गावात घडलेली सत्‍य घटना आहे. नवीनच लग्‍न झालेली 21 वर्षीय तरुणी अशा पद्धतीने गायब झाल्याने तिच्‍या पतीलाही धक्का बसला आहे. या प्रकरणात मलकापूर ग्रामीण पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली आहे.

सौ. सुजाता अरविंद सोनवणे असे या तरुणीचे नाव आहे. पाच फूट उंची, गोरा रंग, अंगात लाल साडी व लालच ब्‍लाऊज, गळ्यात सोन्याची पोत, दोन्ही हातांवर मेहंदी काढलेली अशी ही तरुणी 20 एप्रिलच्‍या मध्यरात्री 12 ला घराबाहेर जाताना पतीला दिसली. पतीने आवाज दिला. पण तिने लक्ष न देता अंधाराकडे निघून गेली. नंतर गायब झाली. तिच्‍या पतीने शोध घेतला पण मिळून आली नाही. ती कुठे कुणाला आढळल्‍यास 07262- 222258 वर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

8 दिवसांत 14 महिला, मुली बेपत्ता

दरम्‍यान, बुलडाणा लाइव्‍हच्‍या हाती आलेल्या माहितीनुसार, गेल्या 8 दिवसांतच तब्‍बल 14 महिला, मुली बेपत्ता झाल्या आहेत, तर 5 पुरुष, मुले बेपत्ता झाली आहेत. बेपत्ता झालेल्या मुली/महिला अशा ः कोमल उर्फ पूजा गजानन शिंगाडे (23, जलंब), कु. स्वाती विश्वनाथ चंदनशिव (18, सुभाषचंद्रबोसनगर, मलकापूर), कु. अश्लेषा शेषराव लव्हाळे (22, रा. धामणगाव बढे, ता. मोताळा), योगिता समाधान पोकळे (20, रा. रोहिणखेड, ता. मोताळा), सौ. किरण संतोष बरडे (24, रा. बालाजी गल्ली, सिंदखेड राजा), वंदना सिद्धार्थ इंगळे (39, बहापुरा, मलकापूर), कु. वैष्णवी प्रल्हाद देशमुख (20, रा. सिरजगाव देशमुख, ता. खामगाव), सौ. प्रियांका गजानन डोईफोडे (45, साठेगाव, ता. सिंदखेड राजा), निलम मधुकर वानखेडे (19, रा. वडाळी, ता. मेहकर), प्रगती जनार्दळ सराफ (20, चिखली), कु. वैष्णवी सिद्धार्थ वानखेडे (20, रा. तरवाडी, ता. मोताळा), सुजाता अरविंद सानोने (21, हिंगणा काझी, ता. मलकापूर), कु. दीक्षा कैलास पनाड (19. सुलतापूर, ता. मेहकर).

बेपत्ता झालेले पुरुष

सनी उर्फ संघप्रिय आनंद मोरे (22, मेहकर), दीपक देविदास गाडे (25, हिंगणा इसापूर, ता. शेगाव), ज्ञानेश्वर देविदास साखरे (ता. तांबुळवाडी, ता. चिखली), सुदाम कडूबा जाधव (59, हिवरा आश्रम, ता. मेहकर), परमेश्वर नारायण खोडके (27, डिझी, ता. नांदुरा), श्रीराम उर्फ शुभम वसंत डवले (26, देवधाबा, ता. मलकापूर).