मध्यरात्री 12.30 पर्यंत घरासमोर असलेली दुचाकी पहाटेपर्यंत केली गायब; धाड येथील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मध्यरात्री साडेबारापर्यंत घरासमोर दुचाकी होती. त्यानंतर ती कुणीतरी गायब केली. आज, 6 मे रोजी सकाळी ही बाब समोर आली. या प्रकरणी धाड पोलीस ठाण्यात मार्केटिंग प्रतिनिधीने तक्रार दिली असून, त्यावरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र कल्याणदास श्रावगी (36, रा. गायत्रीनगर, धाड) यांनी तक्रार दिली, की काल 5 मे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मध्यरात्री साडेबारापर्यंत घरासमोर दुचाकी होती. त्‍यानंतर ती कुणीतरी गायब केली. आज, 6 मे रोजी सकाळी ही बाब समोर आली. या प्रकरणी धाड पोलीस ठाण्यात मार्केटिंग प्रतिनिधीने तक्रार दिली असून, त्‍यावरून चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र कल्याणदास श्रावगी (36, रा. गायत्रीनगर, धाड) यांनी तक्रार दिली, की काल 5 मे रोजी संध्याकाळी 7 च्‍या सुमारास घरी आलो व मोटारसायकल घरासमोर लावली. शेजारील एकनाथ दौड मध्यरात्री साडेबाराला शेतातून घरी आले. तोपर्यंत मोटारसायकल जागेवरच होती. मात्र आज 6 मेच्‍या सकाळी 6 वाजता श्रावणी यांच्‍या पत्‍नीने घरासमोर झाडझूड करण्यासाठी दरवाजा उघडला व अंगणात पाहिले असता गाडी घरासमोर उभी दिसली नाही. बराच शोध घेऊनही ती मिळून आली नाही. त्‍यामुळे श्रावगी यांनी धाड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. MH 28 AX 3577 असा गाडीचा नंबर आहे. गाडी 80,000 रुपयांची आहे. तपास नापोकाँ अनिल कुकडे करत आहेत.