मनसुख हिरेन यांची हत्याच झाल्याचा दावा

एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांच्या फेसबुक पोस्टची चर्चा; प्रकरणाचा गुंता सुटल्याचाही दावा मुंबई : राज्यात गाजत असलेल्या ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांची हत्याच झाली असून या प्रकरणाचा उलगडा करण्यात महाराष्ट्र एटीएस पथकाला यश आले आहे. तसा दावा एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी केला आहे. लांडे यांनी फेसबुक केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. हे …
 

एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांच्या फेसबुक पोस्टची चर्चा; प्रकरणाचा गुंता सुटल्याचाही दावा

मुंबई : राज्यात गाजत असलेल्या ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांची हत्याच झाली असून या प्रकरणाचा उलगडा करण्यात महाराष्ट्र एटीएस पथकाला यश आले आहे. तसा दावा एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी केला आहे. लांडे यांनी फेसबुक केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. हे अतिशय गुंतागुंतीचे व अतिसंवेदनशील प्रकरण सोडविण्यात एटीएस टीमला यश आले, याचा मला अभिमान आहे. हे हत्या प्रकरण सोडविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असा दावा शिवदीप लांडे यांनी केला आहे.

शिवदीप लांडे यांनी पुढे म्हटले आहे की. अतिसंवदेनशील अशा मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा गुंता आम्ही सोडवला. मी माझ्या एटीएस पोलीस फोर्सच्या सगळ्या साथ्ीदारांना सलाम करतो. एटीएसचे सगळे अधिकारी,कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर काम करत होते. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण हे माझ्यासाठी आतापर्यंतच्या सर्वात कठीण प्रकरणांपैकी एक होते.
मनसुख हिरन प्रकरणात एटीएसने दोन आरोपींना अटक केली आहे. त्यात एका माजी पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदेचा समावेश आहे. तो कुुख्यात गुंड लखन भैय्या प्रकरणात आरोपी आहे. कोविड काळात तो रजेवर बाहेर होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात त्याचा हात असल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकरणचा सुत्रधार सचिन वाझे हाच सूत्रधार असल्याचेही तपासात उघड झाल्याचे सू़त्रांचे म्हणणे आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकप्रकरणात सचिन वाझेचा सहभाग असल्याचा संशय असून या प्रकरणाचा तपास एनआएकडून केला जात आहे. त्यापाठोपाठ मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही एनआयएकडे सोपविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती.त्याआधीच एटीएसने हे प्रकरण सोडविल्याचे सांगण्यात येत आहे.