मनसैनिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या गावखेड्यांच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज, १० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात गावखेड्यातील रस्त्यांची संपूर्ण चाळण झाली असून, त्यामुळे शेतकरी वर्गाला आपला माल बाजारात नेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुचाकीच्या अपघातात …
 
मनसैनिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या गावखेड्यांच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज, १० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जिल्ह्यात गावखेड्यातील रस्त्यांची संपूर्ण चाळण झाली असून, त्यामुळे शेतकरी वर्गाला आपला माल बाजारात नेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुचाकीच्या अपघातात वाढ झाली असल्याने जिल्हा परिषद अंतर्गत येणारे रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे, असे निवेदनात म्‍हटले आहे. आंदोलनाचे नेतृत्त्व जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी केले. जिल्हा उपाध्यक्ष बाळराजे देशमुख, बुलडाणा शहराध्यक्ष शहराध्यक्ष मनोज पवार, तालुकाध्यक्ष भागवत उगले, राजू मांटे, गजानन टेकाळे, नीलेश देवरे, शिवचरण पाटील, पंकज पाटील, विजय पडोळ, नांदुरा शहराध्यक्ष सागर जगदाळे, नांदुरा शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे, शिक्षक सेना शहराध्यक्ष अनिल वाघमारे, अनिल मोरे, नांदुरा शहराध्यक्ष सागर जगदाळे, विजय शिंगणे, अंकित अवचार, निकेतन वाघमारे, येागेश सपकाळ, दर्गेश बारगजे, राजू काळे , ज्ञानेश्वर कांदेलकर, शिवम भुते, शिवा गुजर, गौरव महाले, प्रदीप निमकर्डे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते.