मनाई हुकूम! जिल्हावासियांनो परभणीला जायचा बेत असेल तर करा कॅन्सल! सीमेवरच अडविली जातील वाहने!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हेडिंग वाचून चक्रावून गेले असाल तर त्याला नाईलाज आहे. मात्र खरेच तूर्तास तरी तिकडे जाण्याचा विचार करू नका. आता केलाच असेल तरी तुमची वाहने परभणी जिल्ह्याच्या सीमेवरच अडवली जातील हे नक्की. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील शहरी भागात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. यामुळे याचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हेडिंग वाचून चक्रावून गेले असाल तर त्याला नाईलाज आहे. मात्र खरेच तूर्तास तरी तिकडे जाण्याचा विचार करू नका. आता केलाच असेल तरी तुमची वाहने परभणी जिल्ह्याच्या सीमेवरच अडवली जातील हे नक्की.

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील शहरी भागात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. यामुळे याचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी विविध निर्बंध लावून उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये एका वेगळ्या उपायाचा समावेश आहे. यानुसार बुलडाण्यासह विदर्भातील 11 जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक वाढला असल्याने त्यांनी या जिल्ह्यांतून परभणीत होणारी वाहतूक बंद केली आहे. बुलडाण्यासह या जिल्ह्यांतून येणाऱ्या खाजगी व सार्वजनिक वाहतूक सेवा करणाऱ्या वाहनांना परभणी जिल्ह्यात येण्यास त्यांनी मनाई केली आहे. आज यासंदर्भातील आदेश काढण्यात आले. तसेच परभणीमधून बुलडाणासह विदर्भातील 11 जिल्ह्यांत जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याची माहिती जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, एसटीचे विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांना देण्यात आली आहे.