मराठमोळ्या १८ वर्षीय एंजल मोरेची ही कामगिरी तर वाचा, तुम्‍ही तोंडात बोट घालाल…

मुंबई ः तब्बल १४ तास २३ मिनिटे महाकाय सागरी लाटांशी झुंज देऊन ४५ कि.मी. अंतर पोहून पार करण्याचा विक्रम मराठमोळ्या एंजल मोरेने केला आहे. एंजल मूळची महाराष्ट्रातील नाशिकची असून, सध्या ती आई- वडिलांसह अमेरिकेत राहते. १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी तिने इंग्लिश खाडी पार केली आणि असामान्य यश मिळवले. १५ सप्टेंबरच्या पहाटे …
 
मराठमोळ्या १८ वर्षीय एंजल मोरेची ही कामगिरी तर वाचा, तुम्‍ही तोंडात बोट घालाल…

मुंबई ः तब्बल १४ तास २३ मिनिटे महाकाय सागरी लाटांशी झुंज देऊन ४५ कि.मी. अंतर पोहून पार करण्याचा विक्रम मराठमोळ्या एंजल मोरेने केला आहे. एंजल मूळची महाराष्ट्रातील नाशिकची असून, सध्या ती आई- वडिलांसह अमेरिकेत राहते.

१५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी तिने इंग्लिश खाडी पार केली आणि असामान्य यश मिळवले. १५ सप्टेंबरच्या पहाटे साडेचारला ती मोहिमेवर निघाली. सोसाट्याचा वारा अन्‌ महाकाय सागरी लाटांमुळे तिच्यासमोर मोठे आव्हान होते. सोबतचे पाच स्पर्धक या महाकाय लाटांना घाबरून माघारी फिरले. मात्र एंजल हिंमत हारली नाही. तिने मोठ्या आत्‍मविश्वासाने ते अंतर कापलेच. ती ५ वर्षांची असल्यापासून पोहण्याचा सराव करते. सध्या ती १८ वर्षांची आहे.