मराठा आरक्षण निर्णय : विविध संघटना संतप्त; जिल्ह्यात कलम ३७ लागू; मिरवणूक, मेळावे काढण्यास बंदी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांत संतप्त भावना व्यक्त झाली आहे. याची काही अनुचित प्रतिक्रिया उमटू नये म्हणून आणि कायदा- सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यात उद्या ७ ते २१ सप्टेंबर दरम्यान कलम ३७ लागू करण्यात आले आहे. याद्वारे मिरवणूक, मेळावे आयोजित करण्यासह …
 
मराठा आरक्षण निर्णय : विविध संघटना संतप्त; जिल्ह्यात कलम ३७ लागू; मिरवणूक, मेळावे काढण्यास बंदी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांत संतप्त भावना व्यक्त झाली आहे. याची काही अनुचित प्रतिक्रिया उमटू नये म्हणून आणि कायदा- सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यात उद्या ७ ते २१ सप्टेंबर दरम्यान कलम ३७ लागू करण्यात आले आहे. याद्वारे मिरवणूक, मेळावे आयोजित करण्यासह विविध प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी आज, ६ सप्‍टेंबरला संध्याकाळी यासंदर्भातील आदेश जारी केले.

आदेशानुसार जमाव गोळा करणे, मिरवणूक, मेळावे आयोजित करणे, पारंपरिक व अन्य शस्त्र बाळगणे, दगड विटा एकत्र जमा करणे वा वाहतूक करणे, पुतळ्याचे प्रदर्शन, विस्फोटकांच्या कच्च्या मालाची वाहतूक, जाहीररीत्या ओरडणे यास मनाई करण्यात आली आहे. मराठा आरक्षण निर्णय बरोबरच १० सप्टेंबरपासून सुरू होणारा गणेशोत्सव, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांकडून इंधन दरवाढ विरोधात करण्यात येणारी आंदोलने लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. उद्या सकाळी सहा ते २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री पर्यंत हे कलम लागू राहणार आहे. मेळावे व मिरवणुकीसाठी ठाणेदारांकडे अर्ज आला तर त्यांनी संबंधित एसडीओ वा तहसीलदार यांच्या समवेत चर्चा करणे बंधनकारक करण्यात आले आहे.