मराठी पाऊल पडते पुढे…नांदुऱ्याच्‍या युवा उद्योजकाने दाखवून दिले, की मराठी माणूस कुठेच मागे नाही..!; पशुखाद्य उत्‍पादनात ‘प्रभास’चा डंका!!

खामगाव (संतोष देठे पाटील) ः मराठी माणूस म्हटलं की व्यवसायात कच्चा पडतो, असे सर्रास म्हटले जाते. पण हा समज विठ्ठल अर्जुन पाटील यांनी केवळ खोटाच ठरवला नाही तर आपल्या यशाने असे बोलणाऱ्यांची तोंडेही गप्प केली आहेत. मराठी माणूस मनात आणलं तर व्यवसाय यशस्वी करूही शकतो आणि त्या व्यवसायाचा लौकिक पार राज्यापार नेऊ शकतो, हेच त्यांनी …
 

खामगाव (संतोष देठे पाटील) ः मराठी माणूस म्‍हटलं की व्‍यवसायात कच्‍चा पडतो, असे सर्रास म्‍हटले जाते. पण हा समज विठ्ठल अर्जुन पाटील यांनी केवळ खोटाच ठरवला नाही तर आपल्या यशाने असे बोलणाऱ्यांची तोंडेही गप्प केली आहेत. मराठी माणूस मनात आणलं तर व्‍यवसाय यशस्वी करूही शकतो आणि त्‍या व्यवसायाचा लौकिक पार राज्‍यापार नेऊ शकतो, हेच त्‍यांनी दाखवून दिले आहे. मनात इच्‍छाशक्‍ती असली की कोणतीच गोष्ट अशक्‍य नसते, हे त्‍यांनी सिद्ध केले आहे. श्री. पाटील यांची आजवरची कामगिरी थक्‍क करणारी आहे. नांदुरासारख्या ग्रामीण भागात पशुखाद्याची निर्मिती करणारा प्रभास अॅग्रो इंडस्ट्रीज नावाने त्‍यांनी उद्योग सुरू केला. या उद्योगाने आज त्‍यांचे नाव केवळ राज्‍यच नव्‍हे तर परराज्‍यातही पोहोचवले आहे. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जात नसल्याने आजघडीला प्रभास हे नाव पशुखाद्यासाठी आवर्जुन घेतले जाते.

डी.एड., बी.एड., एम.ए. झालेले विठ्ठल पाटील शिक्षक झाले असते तर ठराविक आयुष्य जगले असते. पण डोळ्यांतील स्‍वप्‍ने काही वेगळीच होती. आज तीच त्‍यांची स्‍वप्‍नं पूर्ण होताना दिसत आहेत. सुरुवातीला हा उद्योग सुरू करण्यामागे त्‍यांचा उद्देश अगदी साधा होता. आपल्या भागातील पशुपालकांना उच्‍च दर्जाचे पशुखाद्य मिळावे, असे त्‍यांना वाटले. पण केवळ बुलडाण्याच्‍या घाटाखालीच नव्‍हे तर घाटावर आणि राज्‍य आणि परराज्‍यातही त्‍यांच्‍या उत्‍पादनांना मागणी वाढू लागली तेव्‍हा तेही या अनपेक्षित यशाने चकीत झाले होते. नवीन बायपास रोडवरील गजानन नगरीत त्‍यांची प्रभास अॅग्रो इंडस्ट्रीज आहे. याशिवाय त्‍यांचा श्री गजानन ट्रेडर्स अडत दुकान आणि धान्य खरेदी व विक्री हा व्‍यवसायही आहे. उच्‍च दर्जाचा प्रभास गोल्ड सुग्रास, प्रभास गोल्ड मका भरडा, मका दाना आदी उत्‍पादने ते विक्री करतात.

सुरुवातीला त्‍यांनाही या व्‍यवसायात अडचणी आल्या, पण ते अनुभवातून शिकत गेले. व्यवसायातील यशाचे गमक त्‍यांनी बुलडाणा लाइव्‍हला सांगितले, ते म्‍हणजे त्‍यांना मिळत असलेले वडिलांचे आशीर्वाद आणि सहकार्य. त्‍यांचे मोठे भाऊ आणि वडील अडत दुकान सांभाळतात. ते स्‍वतः कंपनी सांभाळतात. घरची शेतीही सांभाळावी लागते. कुटुंबातील सर्व सदस्य आपापले काम करत असल्याने कोणतीही अडचण येत नाही, असे ते सांगतात.

ग्राहकांना संदेश देताना ते म्‍हणतात, की ग्राहकांनी योग्य त्या मालाची निवड करावी. आपण आपल्या पशुंना कोणता आहार घालतो याकडे लक्ष द्यावे. दर्जाशी तडजोड करू नये, असा सल्लाही ते देतात. भविष्यात आपल्या भागातील पशु पालकांना कमीत कमी किंमतीत उच्च प्रतिचा पशूआहार कसा देता येईल याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करणार असल्याचे ते म्‍हणाले. मुलगा प्रभासचा जन्‍म होणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे ते सांगतात. श्री. पाटील यांचा संपर्क क्रमांक 9604818964 व 7020513583 आहे.