मराठी भाषिक वाघ आहेत, असे स्टेटस ठेवणार्‍या तरुणांना कानडी पोलिसांची मारहाण

बेळगाव : बेळगावसह सीमाप्रांतातील मराठी भाषिकांवर कानडी पोलिसांकडून अन्याय, अत्याचार सुरूच आहे. गेल्या आठवड्यात कोल्हापूर येथील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना बेळगाव येथे कन्नड वेदिका रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या घटनेचे दोन्ही राज्यांत गंभीर पडसाद उमटले होते. ही घटना ताजी असतानाच आता ‘मराठी भाषिक वाघ आहे‘ असे स्टेटस सोशल मीडियात ठेवणार्या दोन तरुणांना बेळगाव पोलिसांनी बेदम …
 

बेळगाव : बेळगावसह सीमाप्रांतातील मराठी भाषिकांवर कानडी पोलिसांकडून अन्याय, अत्याचार सुरूच आहे. गेल्या आठवड्यात कोल्हापूर येथील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना बेळगाव येथे कन्नड वेदिका रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या घटनेचे दोन्ही राज्यांत गंभीर पडसाद उमटले होते. ही घटना ताजी असतानाच आता ‘मराठी भाषिक वाघ आहे‘ असे स्टेटस सोशल मीडियात ठेवणार्‍या दोन तरुणांना बेळगाव पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. हे चारही तरुण बेळगाव जिल्ह्यातील मच्छे या गावातील आहेत. त्यांनी कानडी पोलिसांच्या व संघटनांच्या अन्यायाचा निषेध करत व्हॉटसअ‍ॅपवर ‘मराठी भाषिक वाघ आहेत‘ असे स्टेटस ठेवले होते. सोशल मीडियात त्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्याचा सुगावा लागताच पोलिसांनी या तरुणांना पकडले व त्यांना बेल्ट, लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या तरुणांचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर या घटनेचा व पोलिसांच्या मारहाणीचा तीव्र निषेध होत असून त्यावर संताप व्यक्त होत आहे. कानडी पोलिसांची हा दंडेलशाही किती दिवस चालणार? असा सवाल विचारला जात आहे.