मलकापुरात पकडला 9 किलो गांजा!; दोघांना अटक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे छापा मारून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 9 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई काल, 23 मे रोजी करण्यात आली. योगेश चंदन जैस्वाल (48), गोविंदा श्रीकृष्ण थेरोकार (22, दोघे रा. कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) अशी आरोपींची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः  बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने मलकापूर तालुक्‍यातील धरणगाव येथे छापा मारून दोघांना ताब्‍यात घेत त्‍यांच्‍याकडून 9 किलो 700 ग्रॅम गांजा जप्‍त केला आहे. ही कारवाई काल, 23 मे रोजी करण्यात आली.

योगेश चंदन जैस्वाल (48), गोविंदा श्रीकृष्ण थेरोकार (22, दोघे रा. कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. जळगाव जिल्ह्यातून मोटारसायकलने मलकापूर तालुक्‍यात गांजा येणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने धरणगावनजीक सापळा रचला होता. एका दुचाकीवर पांढऱ्या खताच्या थैलीत काहीतरी घेऊन येताना दोघे जण पथकाला दिसले. एलसीबीने तपासणी केली असता त्यात 9 किलो 700 ग्रॅम मिळून आला. 1 लाख 16 हजार 400 रुपयांचा गांजा, दोन मोबाइल (किंमत 9 हजार), एक बजाज पल्सर मोटारसायकल (किंमत 50 हजार) असा एकूण 1लाख 91 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही आरोपींना मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. रात्री उशिरा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्‍या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्‍या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक नागेशकुमार, सहायक पोलीस निरिक्षक मनिष गावंडे, पोलीस उप निरिक्षक श्रीकांत जिंदमवार, गजानन आहेर, संजय नागवे यांनी केली.