मलकापूरमध्ये मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वाराचा पळ!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विवाहितेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वाराने पळ काढल्याची घटना मलकापूर शहरातील कोलते इंजिनिअरिंग कॉलेजसमोर ३० जूनला घडली. या प्रकरणी ४ जुलैला विवाहितेने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौ. रुपाली परेश कोलते (२७, रा. नरवेल, ता. मलकापूर) यांनी तक्रार दिली, की ३० जूनला मुलगा उत्कर्षची …
 
मलकापूरमध्ये मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वाराचा पळ!

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विवाहितेचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वाराने पळ काढल्याची घटना मलकापूर शहरातील कोलते इंजिनिअरिंग कॉलेजसमोर ३० जूनला घडली. या प्रकरणी ४ जुलैला विवाहितेने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सौ. रुपाली परेश कोलते (२७, रा. नरवेल, ता. मलकापूर) यांनी तक्रार दिली, की ३० जूनला मुलगा उत्कर्षची (८) अचानक तब्बेत खराब झाल्याने त्‍या पती परेश कोलते यांच्‍यासोबत मोटारसायकलवर मलकापूरला डॉ. प्रशांत बोराडे यांच्‍या दवाखान्यात आल्या होत्‍या. उपचारानंतर नरवेलला परतताना दीडच्‍या सुमारास कोलते इंजिनिरिंग काॅलेजसमोरून जाताना मागून एक २५ ते ३० वर्षे वयोगटातील अंगात लाल शर्ट असलेला तोंडाला पांढरा रूमाल बांधलेला तरुण दुचाकीवरून आला. त्याने गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याचे मनी व सोन्याचे डोरले असलेली पोत (अंदाजे किंमत २५ हजार रुपये) हिसकावून पळून गेला. मोटारसायकलवर नंबर नव्‍हता. ती रेसर मोटारसायकल होती. आरडाओरड करेपर्यंत तो पळून गेला. पोलिसांनी गुन्‍हा दाखल करून मंगळसूत्रचोराचा शोध सुरू केला आहे.