मलकापूर पांग्रा ः फक्‍त रिचार्ज मारा अन्‌ हॅलो हॅलो करत बसा…

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर पांग्रा परिसरात महिनाभरापासून जिओ कंपनीच्या सीमकार्डला नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉल मध्येच बंद पडणे, समोरच्या व्यक्तीचा आवाज ऐकू न येणे, फोन पे , गुगल पे, बिझनेस ॲप वापर न करता येणे, इंटरनेट सेवेचा लाभ घेता येत नसल्याने मोबाईल धारकांकडून …
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मलकापूर पांग्रा परिसरात  महिनाभरापासून जिओ कंपनीच्‍या सीमकार्डला नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.

कॉल न लागणे, कॉल मध्येच बंद पडणे, समोरच्या व्यक्तीचा आवाज ऐकू न येणे, फोन पे , गुगल पे, बिझनेस ॲप वापर न करता येणे, इंटरनेट सेवेचा लाभ घेता येत नसल्याने मोबाईल  धारकांकडून संताप व्यक्त होत आहे.  एकीकडे रिचार्ज दर वाढत असताना  दुसरीकडे नेटवर्क मिळत नसल्याने  पैसे देऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व कंपन्यांचे  प्लॅन हे  मासिक, त्रैमासिक ,अर्धवार्षिक, वार्षिक असल्यामुळे दिवस तर संपत आहे.परंतु सेवेचा लाभ घेता येत नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इंटरनेट बंद असल्यामुळे कुठले प्रकारचा फॉर्म भरता येत नाही की कुठले प्रवेशपत्र डाऊनलोड करता येत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा, ऑनलाईन फॉर्म भरले जात नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत  आहे. ऑनलाइन शिकवणी चालू असल्यामुळे पालकांना, विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित  कंपनीने  नेटवर्कवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.