मला नवऱ्यासोबत नाही… प्रियकरासोबत नांदायचे आहे…!; विवाहितेने पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात येऊन सांगितली ‘प्‍यारवाली लव्‍हस्‍टोरी’!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 28 मे रोजी 20 वर्षीय पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात विवाहिता हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला. तपास सुरू असतानाच काल, 30 मे रोजी ही विवाहिता एका तरुणासह पोलीस ठाण्यात हजर झाली. मला नवऱ्यासोबत नाही तर प्रियकरासोबत राहायचे आहे, असा जबाब तिने पोलिसांना दिला आणि एक क्षण …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 28 मे रोजी 20 वर्षीय पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात विवाहिता हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला. तपास सुरू असतानाच काल, 30 मे रोजी ही विवाहिता एका तरुणासह पोलीस ठाण्यात हजर झाली. मला नवऱ्यासोबत नाही तर प्रियकरासोबत राहायचे आहे, असा जबाब तिने पोलिसांना दिला आणि एक क्षण पोलीसही हादरून गेले… तिचा नवरा तर भोवळ यायचा बाकी राहिला..

हिवरा बुद्रूक (ता. खामगाव) येथील 20 वर्षीय विवाहिता कुणाला काहीही न सांगता घरून निघून गेली होती. तिच्‍या पतीने बायको हरवल्याची तक्रार पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांना बायकोला शोधण्याची विनंती केली. शोध सुरू असतानाच 30 मे रोजी ही विवाहिता तिच्या प्रियकरासोबत पोलीस ठाण्यात हजर झाली. मला नवऱ्यासोबत राहायचे नसून, प्रियकरासोबतच राहायचेय, असे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिच्या नवऱ्याला बोलावून घेतले. तिने पुन्‍हा तोच कित्ता गिरवल्याने बायकोची दुसऱ्यासोबतची ती प्यारवाली लव्हस्टोरी ऐकून नवऱ्याच्‍या पायाखालची जमीनच सरकली… पुढे काय झाले, हे उद्या सांगू… तूर्त एवढेच..! उद्या बुलडाणा लाइव्‍ह वाचत राहा…