महाचाचण्या; महापॉझिटिव्ह! पॉझिटिव्ह नवशेच्या घरात!! बुलडाण्यात पुन्हा द्विशतक, मेहकरात स्फोट, चौघांचे मृत्यू

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः विकेंडला नमुने संकलन व चाचण्यांचा वेग वाढल्याने कोरोना पॉझिटिव्हचे आकडे देखील वाढले! आज, 11 एप्रिलला जिल्ह्यात तब्बल 898 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. बुलडाण्यातील उद्रेक कायम असतानाच मेहकर तालुक्यात कोरोनाचा स्फोट झालाय! यामुळे केंद्रीय पथकासह प्रशासन व आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. सलग 3 दिवस सहाशेच्या आसपास रुग्ण आल्यावर आठवड्याच्या अखेरीस शनिवारी 845 …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः विकेंडला नमुने संकलन व चाचण्यांचा वेग वाढल्याने कोरोना पॉझिटिव्हचे आकडे देखील वाढले! आज, 11 एप्रिलला जिल्ह्यात तब्बल 898 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. बुलडाण्यातील उद्रेक कायम असतानाच मेहकर तालुक्यात कोरोनाचा स्फोट झालाय! यामुळे केंद्रीय पथकासह प्रशासन व आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

सलग 3 दिवस सहाशेच्या आसपास रुग्ण आल्यावर आठवड्याच्या अखेरीस शनिवारी 845 तर रविवारी 898  पॉझिटिव्ह आढळले. अर्थात मोठ्या संख्येने नमुने संकलन व चाचण्या करण्यात आल्याचा हा परिणाम आहे. रॅपिड, ट्राउंट व आरटीपीसीआर मिळून 8 हजारांवर नमुने करण्यात संकलीत करण्यात आले. यातील तब्बल 8579 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 7621 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 898 पॉझिटिव्ह आलेत. यामध्ये आघाडीवर कोण, हा प्रश्न मागील 25 दिवसांपासून निरर्थक ठरलाय! याचे कारण बुलडाणा तालुका टॉपरच आहे. गत 24 तासांत तालुक्यात 210 रुग्ण आढळले आहेत. मात्र काही दिवसांपासून उद्रेक वाढलेल्या मेहकर तालुक्यात स्फोट झाल्याप्रमाणे तब्बल 182 पॉझिटिव्ह आढळल्याने तालुका हादरलाय! मोताळा तालुक्यातील संख्याही 88 पर्यंत गेली आहे. दुसरीकडे चिखलीने ब्रेकनंतर आज पुन्हा तिहेरी (120) आकडा गाठला.  खामगाव 64, देऊळगाव राजा 64, नांदुरा 62, सिंदखेड राजा 35, शेगाव 29,  मलकापूर 21, लोणार14, जळगाव 8, संग्रामपूर 1 या तालुक्यांनी त्यात आपल्या परीने भर घातली.

4 बळी

दरम्यान, शेगाव व मलकापूरमधील रुग्णसंख्या आटोक्यात आहे हा दिलासा मानता येईल. मात्र 24 तासातील 4 बळींचे काय?, असा सवाल आहे. मृत्यूची वाढती संख्या चिंतेत पाडणारी ठरावी अशीच आहे. बुलडाणामधील महिला रुग्णालय व सहयोग हॉस्पिटलमधील प्रत्येकी 1 मलकापूरमधील शासकीय कोविड केंद्र व ऑक्सिजन हॉस्पिटलमधील प्रत्येकी 1 असे 4 रुग्ण दगावले. यामुळे बळींची संख्या 306 पर्यंत गेलीय.