‘महाडीबीटी’वरील नोंदणीची मुदत वाढवा!; ‘या’ सरपंचांनी सांगितले हे विशेष कारण..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके, गळीत धान्य व व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनिकीट या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी २० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या तारखेपर्यंतच नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके, गळीत धान्य व व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनिकीट या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी २० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  या तारखेपर्यंतच नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाणार आहे. मात्र सध्या कडक लॉकडाऊन असल्याने अनेक शेतकरी बांधव अर्ज करू शकले नाहीत. त्‍यामुळे नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी हिवरा गडलिंगच्‍या सरपंच पूनम अनंतकुमार खरात यांनी केली आहे.

शेतकरी बांधवांनी mahadbtit या पोर्टलवर अर्ज करावे.  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके राबविण्यात येत आहे. जिल्ह्याकरीता कडधान्य पिके, तृणधान्य, गळीत धान्य, व्यापारी पिके (कापूस), बियाणे वितरण  केलेल्या जिल्ह्यांमध्ये भात बियाण्यासाठी १० वर्षांआतील वाणास रु. २०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु. १०/- प्रती किलो. कडधान्य बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. 5०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु. २५/- प्रती किलो. संकरीत मका व बाजरी बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. १००/- प्रती किलो, ज्वारी व बाजरी सरळ वाणाचे बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. ३०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु. 15/- प्रती किलो. सोयाबीन बियाण्यासाठी १० ते १५ वर्षाचे वाणास रु.१२/- प्रती किलो. एकूण किंमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सूक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार रु. २०००/- ते ४०००/- प्रती एकर मर्यादेत DBT तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. सोयाबीन,बाजरी,ज्वारी, कापूस, मका या पिकांमध्ये मिनिकीट कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य आहे. बियाणे मिनिकीटमध्ये जिल्ह्यात तूर, मूग, उडीद या पिकासाठी असणार आहे.  निवड झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२१ मध्ये तूर, मुग आणि उडीद यापैकी एका पिकाचे ४ किलोचे एक बियाणे मिनिकीट देण्यात येईल. शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. मात्र 20 मेपर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन आहे. त्‍यामुळे अनेक शेतकरी नोंदणीसाठी घराबाहेर पडू शकले नाहीत. त्‍यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी सरपंच पूनम खरात यांनी केली आहे.

अशी आहे मिनीकीट

तूर – रु. ४१२/- प्रती ४ किलो मिनिकीट, मुग – रु. ४०७/- प्रती ४ किलो मिनिकीट, उडीद – रु. ३४९/- प्रती ४ किलो मिनिकीट प्रमाणे अनुदान देय असून बियाणे मिनिकीटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्यांनी अदा करावयाची आहे.