महाडीबीटी पोर्टल योजनाः अर्ज एक, योजना अनेक..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाच्या महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून, शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. यावर्षीपासून जिल्हा परिषदेमार्फत …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शासनाच्या महा-डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून, शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. यावर्षीपासून जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधूंनी आपला वैयक्तिक मोबाइल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने महाडीबीटी पोर्टल योजना ही अर्ज एक व योजना अनेक असलेली आहे. या दोन्ही योजनांमध्ये नवीन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, शेततळे अस्तरीकरण, इलेक्ट्रीक मोटार पंप, ठिबक सिंचन संच व तुषार सिंचन संच याबाबींकरीता सुद्धा महाडीबीटीवर अर्ज करता येणार आहे.

महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदींच्‍या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी.  नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे,मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. या कामासाठी जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेता येणार आहे. तसेच तांत्रिक अडचण असल्यास  helpdeskdbtfarmer@gmail.com या ई मेलवर किंवा 020-25511479 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन कृषि विकास धिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा यांनी केले आहे.