महादेव जानकरांना व्हायचयं खासदार

महाराष्ट्रातून २० आमदार निवडणून आणण्याचे टार्गेटसध्या तरी भाजपसोबत… पण सर्व पर्यायही खुले – जानकरांचा इशारा बारामती : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना आता खासदारकीचे वेध लागले आहेत. बारामती येथे आयोजित एका कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनीच याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच करणार असून महाराष्ट्रातून …
 

महाराष्ट्रातून २० आमदार निवडणून आणण्याचे टार्गेट
सध्या तरी भाजपसोबत… पण सर्व पर्यायही खुले – जानकरांचा इशारा

बारामती : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना आता खासदारकीचे वेध लागले आहेत. बारामती येथे आयोजित एका कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनीच याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी आतापासूनच करणार असून महाराष्ट्रातून चार ते पाच लोकसभा मतदारसंघांतून किमान १५ ते २० आमदार निवडून आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. जास्त आमदार निवडून आणून सत्ताकारणात आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे.त्यादृष्टीने पक्षबांधणी करणार आहोत. भविष्यात मीदेखील खासदार होईनच असा दावाही जानकर यांनी केला आहे. सध्या आपण भाजपसोबतच आहोत.भाजप सोडून महाविकास आघाडीच्या दावणीला बांधल्या जाण्याचा आपला तूर्तास विचार नाही. पण भविष्यात काही वेगळ्या गोष्टी घडल्या तर भाजपला धक्का द्यायलाही आम्ही मागेपुढे पाहणार नाही. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत. भाजप आम्हाला सन्मानाने जागा सोडणार नसेल, मान देणा नसेल तर त्यांनाही आम्ही आमचे उपद्रवमूल्य दाखवून देऊ, असा इशारा जानकर यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भूवया उंचावल्या आहेत.