‘महा’निगेटिव्ह बातमी..!; सकाळीच 350 पॉझिटिव्ह रुग्‍णांचा आकडा!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी)ः जिल्ह्यात 21/2 च्या मुहूर्तावर मिनी लॉकडाऊन घोषित होत नाही तोच कोरोना पॉझिटिव्हच्या आकड्याने प्रशासकीय व आरोग्यविषयक भूकंप घडविला! सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आज, 22 फेब्रुवारीला सकाळीच कोरोना पॉझिटिव्हचा आकडा तब्बल 350 वर पोहोचलाय!! तसेच पॉझिटिव्हीटी दर सुद्धा वाढल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. यामुळे काल जाहीर करण्यात आलेले निर्बंध व लागू करण्यात …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी)ः जिल्ह्यात 21/2 च्या मुहूर्तावर मिनी लॉकडाऊन घोषित होत नाही तोच कोरोना पॉझिटिव्हच्या आकड्याने प्रशासकीय व आरोग्यविषयक भूकंप घडविला! सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आज, 22 फेब्रुवारीला सकाळीच कोरोना पॉझिटिव्हचा आकडा तब्बल 350 वर पोहोचलाय!! तसेच पॉझिटिव्हीटी दर सुद्धा वाढल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. यामुळे काल जाहीर करण्यात आलेले निर्बंध व लागू करण्यात आलेल्या कडक उपाययोजना किती आवश्यक व अपरिहार्य होत्या हे सिद्ध झाले आहे.
गत्‌ 2 दिवसांच्या तुलनेत स्वॅब संकलन कमी करण्यात आले. एकूण 1301 नमुने तपासणीकरिता संकलित करण्यात आले. यासह प्रलंबित मिळून एकूण 1480 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यातील विक्रमी 350 नमुने कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. या तुलनेत 1098 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र हा दिलासा नाममात्र असून, पॉझिटिव्‍हिटी रेट 23.84 टक्‍क्‍यां पर्यंत पोहोचणे ‘ खतरेकी घंटी’ ठरली आहे. सध्या 3330 अहवालांची प्रतीक्षा असून, त्यातील किती पॉझिटिव्ह येतात याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. आजअखेर बळींची संख्या 187 पर्यंत पोहोचली आहे. परिणामी येता आठवडा आरोग्य यंत्रणा व पब्लिकची कठोर परीक्षा घेणारा ठरणार आहे.