महाब्रेकिंग! सरपंच निवडणुकीचा मुहूर्त अखेर जाहीर! 3 टप्प्यांत होणार निवड; 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान ठरणार कारभारी

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः याचसाठी केला होता हट्ट या धर्तीवर देव पाण्यात टाकून बसलेल्या तमाम इच्छुक ग्रामपंचायत सदस्यांची ताणलेली उत्सुकता अखेर आज 2 फेब्रुवारीच्या संध्याकाळी शमली! बहुप्रतिक्षित 527 सरपंच पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला असून, 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान यासाठी 3 टप्प्यांत निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठीच्या आदेशावर आज, 2 फेब्रुवारीला …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः याचसाठी केला होता हट्ट या धर्तीवर देव पाण्यात टाकून बसलेल्या तमाम इच्छुक ग्रामपंचायत सदस्यांची ताणलेली उत्सुकता अखेर आज 2 फेब्रुवारीच्या संध्याकाळी शमली! बहुप्रतिक्षित 527 सरपंच पदाच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला असून, 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान यासाठी 3 टप्प्यांत निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठीच्या आदेशावर आज, 2 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी सायंकाळी उशिरा शिक्कामोर्तब केलंय!
527 ग्रामपंचायतींच्या पहिल्या सभेत सरपंच व उपसरपंच पदाची निवड होणार आहे. आवश्यकतेनुसार प्रथम सरपंच व नंतर उपसरपंच पदासाठी मतदान होणार आहे. 18 जानेवारीला निकाल जाहीर झाल्यानंतर प्रथम सरपंच आरक्षण व नंतर निवडणूक मुहूर्ताची प्रतीक्षा व उत्सुकता ताणली गेली. मात्र एकाच वेळी निवडणूक घ्यायची असल्यास अध्यासी अधिकारी नेमण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसणे, एकाच ग्रामसेवकाकडे 2 ग्रामपंचायतींचा कारभार असणे, कायदा व सुव्यवस्था आदी घटक लक्षत घेता ही निवडणूक 3 टप्प्यांत घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. दीर्घ चिंतनानंतर अखेर 9 ते 11 फेब्रुवारी दरम्यान 527 ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच निवडण्यात येणार आहेत. किरकोळ अपवाद वगळता बहुतेक तालुक्यातील निवडणूक 3 टप्प्यांत पार पडणार आहे. यापूर्वी बुलडाणा लाईव्ह ने निवडणूक 2 टप्प्यांत पार पडणार असे सर्वप्रथम म्हणजे 30 जानेवारी रोजी भाकीत केले होते. यंत्रणांनी यावर दीर्घ चिंतन केले पण, मात्र शेवटी 3 टप्प्यांचा पर्याय निवडण्यात आला.