महावितरणची मान्सूनपूर्व कामे सुरू!; वेळेत कामे पूर्ण करा -अजयसिंह मोहता

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वीज महावितरणतर्फे सध्या मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. महावितरणची संपूर्ण यंत्रणा उघड्यावर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात नुकसान होते. त्यामुळे मान्सूनपुर्व कामांकडे दूर्लक्ष न करता सर्व कामे वेळेच्याआत पूर्ण करण्याचे निर्देश शेगाव येथील महावितरणचे अभियंता अजयसिंह मोहता यांनी दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी वीज वाहिनी व विद्युत प्रणालीची देखभाल दुरुस्तीची कामे …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वीज महावितरणतर्फे सध्या मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. महावितरणची संपूर्ण यंत्रणा उघड्यावर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात नुकसान होते. त्यामुळे मान्सूनपुर्व कामांकडे दूर्लक्ष न करता सर्व कामे वेळेच्याआत पूर्ण करण्याचे निर्देश शेगाव येथील महावितरणचे अभियंता अजयसिंह मोहता यांनी दिले आहेत.

पावसाळ्यापूर्वी वीज वाहिनी व विद्युत प्रणालीची देखभाल दुरुस्तीची कामे महावितरणने हाती घेतली आहेत. तापमानात प्रचंड वाढ झालेली असतानाही तळपत्या व रखरखत्या उन्हात चटके सहन करत तसेच कोरोनाच्या संकटात कर्मचारी दुरुस्तीच्या कामाला लागले आहेत. रोहित्राची तपासणी, त्याचे अर्थिंग व टर्मीनल कनेक्शन चेक करणे, ऑईलची पातळी कायम ठेवणे, फिडर पिलरची दुरुस्ती करणे, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची छटाई, डिस्ट्रीब्यूशन बॉक्समधील फ्यूज बदलविणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, गंजलेले वीजखांब बदलणे, वीजतारांमध्ये स्पेसर्स बसविणे, स्टेवायरने वीजखांबांचा आधार मजबूत करणे, फुटलेले इन्सूलेटर बदलणे, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे आदी कामांचा यात समावेश आहे. यासोबतच उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, खराब झालेले कपॅसीटर बदलणे, आर्थिंग तपासणी करणे, लाइटिंग अरेस्टरची तपासणी करणे व नादुरूस्त असल्यास नवीन लावणे, पॉवर ट्रान्सफॉर्मरची तेलाची पातळी तपासणे, ऑईल टॉपअप करणे, बॅटरी सुस्थितीत ठेवणे, आयसोलेटर अलाइनमेंट तपासणे, दुरूस्ती करणे आदी कामे महाविरणकडून करण्यात येत आहेत.

वीजपुरवठा खंडित होतोय, इथे नोंदवा तक्रार!

वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणकडून नागरिकांना तक्रारी, सूचना नोंदविण्यासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शेगाव शहर शाखा कार्यालय ०७२६५-२५२३६८, ७८७५०४५४५६, ३३ केव्ही उपकेंद्र शेगाव ७८७५३६२८०४, ग्रामीण करिता ३३ केव्ही आनंद सागर उपकेन्द्र  ७८७५३६११६५, ३३ केव्ही वरवट रोड उपकेंद्र ७८७५३६०१६९ या संपर्क क्रमांकांवर नागरिकांना तक्रारी सूचना नोंदविता येणार आहेत.