महावितरणला न कळवताच रोहित्र बदलण्याचा खटाटोप; कामगाराचा मृत्‍यू; इंडूस कंपनीचा कारनामा, मेहकर तालुक्‍यातील दुर्दैवी घटना

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महावितरणची परवानगी न घेता इंडूस टॉवर लिमिटेड नावाच्या कंपनीने रोहित्र बदलण्याचा खटाटोप केला आणि यात एका 45 वर्षीय कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना आज, 29 जूनच्या सकाळी पावणेबाराच्या सुमारास हिवरा खुर्द (ता. मेहकर) शिवारात घडली. दत्तात्रय सुखदेव वाकळे (रा. हिवरा खुर्द) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे …
 

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महावितरणची परवानगी न घेता इंडूस टॉवर लिमिटेड नावाच्‍या कंपनीने रोहित्र बदलण्याचा खटाटोप केला आणि यात एका 45 वर्षीय कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना आज, 29 जूनच्‍या सकाळी पावणेबाराच्‍या सुमारास हिवरा खुर्द (ता. मेहकर) शिवारात घडली.

दत्तात्रय सुखदेव वाकळे (रा. हिवरा खुर्द) असे मृत्‍यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. हिवरा खुर्द येथील 25 केव्‍हीएचे रोहित्र नादुरुस्‍त झाल्याची माहिती इंडूस कंपनीने महावितरणला दिली होती. त्‍यामुळे रोहित्र बदलण्याचे सोपस्‍कार महावितरणकडून पार पाडले जात असतानाच आज कंपनीने महावितरणला न कळवताच नादुरुस्‍त रोहित्र बदलण्याचा खटाटोप केला.

रोहित्र बदलत असताना दत्ता वाकळे यांचा शॉक लागून मृत्‍यू झाला. ही माहिती तंत्रज्ञ प्रवीण भाकडे यांनी महावितरणच्‍या अधिकाऱ्यांनी दिली. त्‍यावरून अधिकाऱ्यांनी जानेफळ पोलिसांना पत्र देत वाकळे यांच्‍या मृत्‍यूला इंडूस कंपनीला जबाबदार धरले आहे. तपास पोहेकाँ गणेश डव्‍हळे करत आहेत.