महाविद्यालयीन विद्यार्थी अपघातात ठार; हिवरा आश्रमला चालला होता…

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिंद्रा लोडिंग वाहन आणि दुचाकीत समोरासमोर अपघात होऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज, 14 एप्रिलला सकाळी दहाच्या सुमारास मलकापूर पांग्रा -साखरखेर्डा रस्त्यावर मलकापूर पांग्रानजिक घडली. गणेश भाऊराव नागरे (22, रा. सोयदेव, ता. सिंदखेड राजा) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो दुचाकीने हिवरा आश्रम …
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महिंद्रा लोडिंग वाहन आणि दुचाकीत समोरासमोर अपघात होऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्‍यू झाला. ही घटना आज, 14 एप्रिलला सकाळी दहाच्‍या सुमारास मलकापूर पांग्रा -साखरखेर्डा रस्‍त्‍यावर मलकापूर पांग्रानजिक घडली.

गणेश भाऊराव नागरे (22, रा. सोयदेव, ता. सिंदखेड राजा) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो दुचाकीने हिवरा आश्रम येथे जात होता. मलकापूर पांग्राजवळील माळावर चढताना समोरून आलेल्या महिंद्रा लोडिंग वाहनाशी त्‍याची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर वाहनचालक स्‍वतःहून साखरखेर्डा पोलीस स्टेशनला हजर झाला. तपास बिबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री. तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार श्री. पवार करत आहेत.