महिंद्रा पीकअपची कारला धडक; राजूर घाटातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिंद्रा मालवाहू पिकअप वाहनाने कारला समोरून जोरदार धडक दिली. यात कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना आज, 27 मे रोजी सकाळी 9 च्या सुमारास राजूर घाटात (ता. बुलडाणा) घडली. याप्रकरणी कारचालक सुरेश पुंडलिक जाधव (37, रा. सरस्वतीनगर बुलडाणा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पीकअप चालक सरदारसिंह हनुसिंग राजपूत (70, रा. मलकापूर सालीपुरा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महिंद्रा मालवाहू पिकअप वाहनाने कारला समोरून जोरदार धडक दिली. यात कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना आज, 27 मे रोजी सकाळी 9 च्‍या सुमारास राजूर घाटात (ता. बुलडाणा) घडली.

याप्रकरणी कारचालक सुरेश पुंडलिक जाधव (37, रा. सरस्वतीनगर बुलडाणा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पीकअप चालक सरदारसिंह हनुसिंग राजपूत (70, रा. मलकापूर सालीपुरा वॉर्ड क्रमांक 32) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश जाधव हे कोऱ्हाळा बाजार (ता. मोताळा) येथे ग्रामसेवक आहेत. ते रोज बुलडाणा येथून कोऱ्हाळा बाजार येथे येणे जाणे करतात. आज सकाळी 9 च्‍या सुमारास राजूर घाटातील देवीच्‍या मंदिराच्‍या अलीकडे त्‍यांच्‍या अल्‍टो कारला समोरून भरधाव येणाऱ्या महिन्द्रा मालवाहक पिकअपने (क्र MH 28 AB 5550) जोरदार धडक दिली. यात अल्टो कारचे (क्र. MH 19 BU 8922) बफर, इंजीन व  हेडलाइट असे अंदाजे 80,000 रुपयांचे नुकसान झाले.