महिलांसाठीही खुले कारागृह उभारणार

पुणेः राज्यात पुरुषांसाठी खुली कारागृहे आहेत. ज्यांची शिक्षा पूर्ण होत आली आहे आणि ज्यांचे वागणे सुधारले आहे, अशा कैद्यांच्या अंगभूत गुणांना खुल्या कारागृहात काम दिले जाते. त्यांच्याकडून उत्पादने तयार करून घेऊन ती बाजारात विकली जातात. उत्पन्नाचा काही वाटा कैद्यांना दिला जातो; परंतु राज्यात महिलांसाठी असे एकही कारागृह नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आता महिलांसाठी …
 

पुणेः राज्यात पुरुषांसाठी खुली कारागृहे आहेत. ज्यांची शिक्षा पूर्ण होत आली आहे आणि ज्यांचे वागणे सुधारले आहे, अशा कैद्यांच्या अंगभूत गुणांना खुल्या कारागृहात काम दिले जाते. त्यांच्याकडून उत्पादने तयार करून घेऊन ती बाजारात विकली जातात. उत्पन्नाचा काही वाटा कैद्यांना दिला जातो; परंतु राज्यात महिलांसाठी असे एकही कारागृह नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आता महिलांसाठी राज्यात खुले कारागृह बांधण्याची घोषणा केली. अनावधानाने एखादे कृत्य घडते. त्यातून न्यायालयानं शिक्षा दिली, तर महिलांना ती पूर्ण करावी लागते. त्यांचे वर्तन सुधारले, तर शिक्षेत काही प्रमाणात सूट दिली जाते;परंतु महिलांना कैद्यांचे जीणे शिक्षा पूर्ण होईपर्यंत जगावेच लागते. पुरुष कैद्यांचे पलायन करण्याचे प्रमाण जास्त असते. त्या तुलनेत महिला कैद्यांचे प्रमाण फारच कमी असते. या पार्श्वभूमीवर महिला कैद्यांसाठी खुले कारागृह उभारण्याचा निर्णय राज्याच्या गृहमंत्रालयाने घेतला आहे.