महिला गार्डच्या डोळ्यात मिरची पूड फेकून १६ कैदी फरार

जोधपूर : कोरोनामुळे एकाच तुरुंगात अनेक कैदी ठेवण्यावर मर्यादा आल्या असून कैद्यांची सुरक्षा तुरुंग प्रशासनासाठी डोकेदुखी बनली आहे. राजस्थानात जोधपूर जिल्ह्यात फलोदी तुुरुंगात विविध कारणांसाठी शिक्षा भोगत असलेले १६ कैदी महिला गार्डच्या डोळ्यात मिरची पूड फेकून फरार झाले आहेत. पोलीस प्रशासनाने कैद्यांना पकडण्यासाठी शहराची नाकेबंदी करून विशेष सर्च अभियान सुरू केले आहे. तसेच सरकारने घटनेच्या …
 

जोधपूर : कोरोनामुळे एकाच तुरुंगात अनेक कैदी ठेवण्यावर मर्यादा आल्या असून कैद्यांची सुरक्षा तुरुंग प्रशासनासाठी डोकेदुखी बनली आहे. राजस्थानात जोधपूर जिल्ह्यात फलोदी तुुरुंगात विविध कारणांसाठी शिक्षा भोगत असलेले १६ कैदी महिला गार्डच्या डोळ्यात मिरची पूड फेकून फरार झाले आहेत. पोलीस प्रशासनाने कैद्यांना पकडण्यासाठी शहराची नाकेबंदी करून विशेष सर्च अभियान सुरू केले आहे. तसेच सरकारने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सूत्रांनी सांगितले की, सुरुवातीला केवळ एक कैदी महिला गार्डच्या डोळ्यात लाल मिरचीचे तिखट फेकून फरार झाला. पण ती महिला गार्ड हल्ल्यातून सावरून डोळे स्वच्छ करून परत येईपर्यंत आणखी १५ कैद्यांनी इतर सुरक्षा रक्षकांना जबर मारहाण करून संधीचा फायदा घेऊन तुरुंगातून पळ काढला.हे कैदी नशेचा अवैध व्यापार, तस्करीच्या आरोपाखाली तुुरंगात बंद होते. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनेला दुजोरा दिला असून प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, तसेच फरार कैद्यांना पुन्हा पकडण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.