महिला डाॅक्टरांच्या निवासस्थानी छुपे कॅमेरे; बडा डाॅक्टर गजाआड

पुणे : भारती विद्यापीठातील एका प्रशिक्षणार्थी महिला डाॅक्टराच्या निवासस्थानातील बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमरे लावल्याप्रकरणी एका बड्या डाॅक्टरांना अटक करण्यात आली आहे. छुपे कॅमेरे लावल्याचे हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले होते. विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते. प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रूममध्ये स्पाय कॅमेरे लावल्याप्रकरणी एका बड्या एमडी डॉक्टरला अटक …
 

पुणे : भारती विद्यापीठातील एका प्रशिक्षणार्थी महिला डाॅक्टराच्या निवासस्थानातील बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमरे लावल्याप्रकरणी एका बड्या डाॅक्टरांना अटक करण्यात आली आहे. छुपे कॅमेरे लावल्याचे हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले होते. विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते.

प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रूममध्ये स्पाय कॅमेरे लावल्याप्रकरणी एका बड्या एमडी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. डॉ. सुजीत जगताप असे त्याचे नाव आहे. डॉक्टरनेच हे छुपे कॅमेरे लावल्याचे उघड झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाने डॉ. सुजीत जगतापला दोन दिवसांची पोलिस कोठाडी सुनावली आहे. डॉक्टरने हा छुपा कॅमेरा असणारा बल्ब अमेझॉनवरून मागवला असल्याचं उघड झाले आहे. ३१ वर्षीय डॉक्टर महिलेच्या स्टाफ क्वार्टरमधील बेडररूम आणि बाथरुममध्ये हे छुपे कॅमेरे सापडले. पुण्यातील भारती विद्यापीठाच्या स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये कॅमेरे लावल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. पीडिता डाॅक्टर सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांना रूममधील बल्ब लागत नसल्याचे आढळळे. त्यांनी वीजतंत्री कामगाराला बोलावले आणि बल्ब काढला, तेव्हा त्यात छुपा कॅमेरा आढळला. त्यानंतर आणखी तपासणी केली असता बाथरूम आणि बेडरूममध्ये कॅमेरे आढळले. त्यानंतर संबंधित पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.