महिला पोलीस कर्मचार्‍यांची मकरसंक्रांत बंदोबस्तावरच!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोलीस म्हटले की सण-उत्सव नसतातच जणू. सामान्यांना सण, उत्सव शांततेत साजरे करता यावेत म्हणून ते ड्युटीवर तैनात असतात. आज मकरसंक्रांतीचा सण हा महिलांसाठी विशेष असतो. पण कर्तव्यकठोर महिला पोलीस कर्मचार्यांनी हा सणही आपल्या कर्तव्यावरच साजरा केला. पहाटे तीनलाच त्यांना स्वयंपाक करून ग्रामपंचायत निवडणुकीच्या बंदोबस्तात सहभागी व्हावे लागले. …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोलीस म्हटले की सण-उत्सव नसतातच जणू. सामान्यांना सण, उत्सव शांततेत साजरे करता यावेत म्हणून ते ड्युटीवर तैनात असतात. आज मकरसंक्रांतीचा सण हा महिलांसाठी विशेष असतो. पण कर्तव्यकठोर महिला पोलीस कर्मचार्‍यांनी हा सणही आपल्या कर्तव्यावरच साजरा केला. पहाटे तीनलाच त्यांना स्वयंपाक करून ग्रामपंचायत निवडणुकीच्या बंदोबस्तात सहभागी व्हावे लागले.

तीळ-गूळ वाटप करून काही महिला पोलीस कर्मचार्‍यांनी सण पोलीस ठाण्यातच साजरा केला. समाजाला सण उत्सव आनंदात साजरे करता यावेत म्हणून आम्ही आमच्या कर्तव्याला प्राधान्य देतो, अशी भावना महिला पोलीस कर्मचार्‍यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना व्यक्त केली. आज सकाळी 3 वाजताच पुरण पोळीचा स्वयंपाक तयार करून महिला पोलीस कर्मचारी निवडणुकीच्या बंदोबस्तावर गेल्या आहेत. सण उत्सवांमध्ये परिवाराला वेळ देत येत नाही. कधी कधी लहान बाळांना घेऊन पोलीस ठाण्यात यावे लागते, असेही महिला पोलीस कर्मचार्‍यांनी सांगितले. कर्तव्याप्रती दक्ष असलेल्या सर्व महिला पोलीस कर्मचार्‍यांच्या कर्तव्यनिष्ठेला बुलडाणा लाइव्हचा सलाम!